Home गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा निधी उपलब्ध करून द्यावा आमदार डॉ...

जिल्हा क्रीडा संकुलच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा निधी उपलब्ध करून द्यावा आमदार डॉ देवरावजी होळी

112
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0029.jpg

जिल्हा क्रीडा संकुलच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा निधी उपलब्ध करून द्यावा

आमदार डॉ देवरावजी होळी

जिल्हा क्रीडा संकुलच्या बांधकामाची पाहणी करून घेतला आढावा

संथ गतीने काम केल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलच्या बांधकामाकरिता आवश्यक असलेला दुसऱ्या टप्यातील निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामा संदर्भातील कामाची आढावा बैठक आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतली
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता ठाकरे मॅडम, कार्यकारी अभियंता श्री साखरवाडे साहेब, श्री सुधीर श्रीवास्तव व्यवस्थापन सल्लागार नागपूर , उपविभागीय अभियंता श्री मुंदडाजी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री दोंदल, प्रामुख्याने उपस्थित होते.

४४. ५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता असलेल्या गडचिरोली जिल्हा केंद्रावरील जिल्हा क्रीडा संकुल (जिल्हा स्टेडियम) चे बांधकाम प्रगतीपथावर आहे. परंतु कामाची गती कमी असल्याने या बांधकामाची पाहणी करतांना आमदार महोदयांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी बांधकामास संदर्भातील असलेल्या अडचणी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या. आत्तापर्यंत कोणकोणती कामे झालीत व त्याकरिता किती निधी खर्च करण्यात आला व पुढे आणखी काय काम बाकी आहे त्याकरिता आवश्यक असणारा निधी किती? याबाबतची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

मागील अनेक वर्षांपासूनप्रलंबीतअसलेले जिल्हा क्रिडा संकुलाचे काम तातडीने होणे आवश्यक असून काम पुर्ण झाल्यास त्याचा मोठा लाभ जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना होईल. त्यामुळे क्रिडांगणाचे काम तातडीने करण्यासाठीं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाकडे केली आहे.

Previous articleमानव विकास योजनांमधुन दारिद्र्य निर्मलन शक्य।
Next articleनेहरूंच्याच धोरणाने देशाचा सर्वांगीण विकास— महेंद्र ब्राम्हणवाडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here