Home नाशिक समर्थ महिला शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना १३ % लाभांश व वर्गणीवरील व्याज ८%...

समर्थ महिला शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना १३ % लाभांश व वर्गणीवरील व्याज ८% दराने देणार-

54
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230930-074614_WhatsApp.jpg

समर्थ महिला शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना १३ % लाभांश व वर्गणीवरील व्याज ८% दराने देणार-

चेअरमन सौ मनीषा कर्डीले यांचे वार्षिक सभेत प्रतिपादन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

समर्थ महिला शिक्षक सहकारी पत संस्थेच्या वतीने सभासदांना १३ % लाभांश व वर्गणी वरील व्याज ८% दराने देण्यात येणार असल्याची माहिती निफाड संस्थेच्या चेअरमन सौ मनिषा पांडुरंग कर्डीले यांनी दिली केले.
निफाड येथील समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा रुद्राय हॉटेल सभागृहात संस्थेच्या चेअरमन सौ मनिषा पांडुरंग कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी सौ कर्डीले यांनी घोषणा केली.प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गणेशाचे प्रतिमेचे पूजन चेअरमन सौ मनिषा कर्डीले,व्हा चेअरमन सौ सुनिता किट्टे,कार्यवाह सौ सुशिला सोनवणे व संचालक मंडळाचे वतीने करणेत आले.याप्रसंगी संस्थेच्या दिवंगत व्हा चेअरमन सौ संजीवनी सुगंधराव देशमुख व संस्थेच्या संचालक श्रीमती अरुणा पुंड यांचे पती दिवंगत विलास धोंडीराम पुंड तसेच अहवाल सालात दिवंगत नेते साहित्यिक दिवंगत झाले असतील त्या सर्वांना सभेत श्रद्धांजली अर्पण करणेत आली.याप्रसंगी प्रास्तविक बँक प्रतिनिधी दत्तू सानप यांनी केले ,संस्थेला सन २०२२/२३ या वर्षात नफा ३६लाख ५१हजार ६६४ रुपये झाला असून संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर लगेच लाभांशाची व वर्गणीवरील व्याजाची रक्कम सभासदांचे राष्ट्रीयीकृत बँक खातेवर वर्ग करण्याची घोषणा चेअरमन सौ मनिषा पांडुरंग कर्डीले यांनी केली,
यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन सौ सुनिता खंडु किट्टे,कार्यवाह सौ सुशिला विजय सोनवणे,संचालक सौ ज्ञानेश्वरी चव्हाणके,सौ अवंतिका गोसावी,सौ स्मिता सुडके,सौ सरिता येवले,सौ रत्ना गायकवाड,सौ विजया नवसारे,सौ अनिता दरेकर,सौ निर्मला शिंदे,सौ सिमा बैरागी,सौ मंदा भागवत,सौ भारती पाटील,सौ वैशाली गांगुर्डे,सौ वैशाली सोनवणे,सौ सारिका लोहारकर डबे,सौ कविता मेहत्तर,सौ शोभा नागरगोजे,सौ आशा थोरात,सौ रंजना देवरे,सौ वंदना नाईकवाडे,माधुरी कुमावत,सौ पल्लवी कुवर,सौ नयना पाटील,सौ आरती बैरागी,श्रीमती जयश्री बोडके,कुंदा पाटोळे,जयश्री सोनवणे,सौ छाया पाटील ,हेमलता पगार ,लिपिक सौ अर्चना सोनारे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ विद्या पाटील पवार,सौंदाणे पत संस्थेच्या संचालक सौ तिलोत्तमा पगार,समितीचे मा राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले,राज्य कार्यकारिणी सदस्य रविंद्र चव्हाणके,राज्य प्रतिनिधी अनंत गोसावी,संघटक दत्तू सानप ,रमेश गांगुर्डे,श्रीकांत देवरे,तालुका नेते अविनाश बागडे,बाळकृष्ण पठाडे,दत्तू निफाडे ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघटना तालुका अध्यक्ष संजय बैरागी,शिक्षक समिती तालुका अध्यक्ष संजय गवळी,कार्याध्यक्ष नवनाथ सुडके,संदीप गायकवाड,सरचिटणीस खंडु किट्टे,भगवान बर्डे,दिलीप कातकाड़े,शंकर सांगळे,विजय शिंदे,शिवाजी जाधव,प्रविण शिंदे, प्रफुल्ल शिवदे,निलेश येवले,किशोर नवसारे,नंदकिशोर घोडेकर,नरेश्वर ठाकूर,केदुजी साळवे,योगेश शिंदे,दिपक सुरंजे,विकास मुळे,सोमनाथ मुरकुटे,दयानंद कवडे,किरण पवार,रविंद्र बागुल,प्रमोद खाटेकर ,पंकज कापडणीस,निलेश निरभवणे,वाळीबा कदम, रावसाहेब डावरे, मंगेश ननावरे आदींसह सभासद शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,अहवाल वाचन बँक प्रतिनिधी दत्तू सानप यांनी केले तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा विषय पत्रिकेप्रमाणे सर्व विषय सभेत चर्चा होऊन टाळ्यांचे गजरात मंजूर करणेत आले.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक पांडुरंग कर्डीले,अनंत गोसावी,रविंद्र चव्हाणके,संजय गवळी यांचे नेतृत्वाखाली चेअरमन सौ मनिषा कर्डीले,व्हा सुनिता खंडु किट्टे,कार्यवाह सौ सुशिला विजय सोनवणे व त्यांचे संचालक मंडळाने स्वच्छ व पारदर्शक कारभार करून आदर्शवत कामगिरी करून पि एम प्लाझा बिल्डिंग दुसरा मजला गाळा नं ९समर्थ भवन स्व मालकीची इमारत घेतली असून सभासदांना ठेवीद्वारे कर्ज पुरवठा देऊन तत्पर व विनम्र सेवा दिली असल्याने अभिनंदनाचा ठराव शंकर सांगळे यांनी मांडून पुढील पाच वर्षांसाठी याच संचालक मंडळास बिनविरोध संधी देऊ या यास समितीचे तालुका अध्यक्ष संजय गवळी,श्रीमती वैशाली गांगुर्डे,सौ सिमा बैरागी यांनी अनुमोदन दिले सभासदांनी टाळ्यांचे गजरात मंजुरी दिली.सूत्र संचलन नवनाथ सुडके यांनी केले व बँक प्रतिनिधी दत्तू सानप यांनी आभार मानले,राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर लगेचच सभासदांचे बँक खात्यावर लाभांश व वर्गणीवरील व्याज रक्कम वर्ग करण्यात आल्याने सभासदांनी धन्यवाद दिले.

@ संस्थेचे भागभांडवल १ कोटी ६९लाख ५० हजार ७८ रुपये असून संस्थेकडे एकूण ठेवी ५ कोटी ४लाख १ हजार ५४३ रुपये असून एकूण निधी १ कोटी २लाख ६० हजार ९७९ रुपये असून कर्ज वाटप ७ कोटी १९ लाख ८८ हजार १०७ रुपये इतके आहे,सभासदांना २०लाख रुपये मुदत कर्ज व ५० हजार रुपये तातडीचे कर्ज दिले जाते,संस्थेने सभासद विमा संरक्षण २० लाख रुपये असून कर्ज वितरणानंतर वसुली सभासद शिक्षक आपले पगारातून वसुली होत असून याकामी गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शालार्थ टीमचे व पं स शिक्षण, सहकार खाते,बँक अधिकारी,सभासद ठेवीदारांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

@ प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींची आर्थिक निकड पूर्ण करून वरदान ठरणाऱ्या निफाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सह पत संस्थेची स्थापना स्व.आमदार मालोजी काका मोगल,जि प मा सदस्य स्व रामकृष्ण वैद्य,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड शांताराम काका बनकर,जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,मा शिक्षण आरोग्य सभापती राजेंद्र मोगल,सभासद बंधू भगिनी,सर्व सहकारी मित्र परिवार यांचे अनमोल सहकार्याने सन १९९२ ला स्थापना केली असून समर्थ महिला शिक्षक सह पत संस्थेची स्थापना आमदार दिलीप काका बनकर,जि प मा अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,जि प मा सदस्य हरीश्चंद्र भवर,वैनतेय शिक्षण संस्थेचे विश्वस्त वि दा व्यवहारे,सर्व सहकारी मित्र परिवार,सभासद बंधू भगिनी,ठेवीदार यांचे अनमोल सहकार्याने सन २००९ मध्ये स्थापना केली असून सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी,ठेवीदार,हितचिंतक,सहकार खाते,पं स शिक्षण विभाग,सर्व सहकारी मित्र परिवाराचे अनमोल सहकार्याने दोन्ही संस्थांचे स्व मालकीच्या इमारती इमारत निधींद्वारे घेण्यात आलेल्या आहेत.

पांडुरंग रामकृष्ण कर्डीले
संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सह पत संस्था निफाड,संस्थापक समर्थ महिला शिक्षक सह पत संस्था निफाड

Previous articleनाशिकरोडला ईदमिलादुनबी सण उत्साहात साजरा
Next articleआत्मा मालिक गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांची विभागस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here