Home नाशिक आत्मा मालिक गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांची विभागस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड–

आत्मा मालिक गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांची विभागस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड–

43
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230930-075249_WhatsApp.jpg

आत्मा मालिक गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांची विभागस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

पुरणगाव तालुका येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल व ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.के.टी.एच एम कॉलेज,नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेमध्ये गुरुकुलाच्या १४ ते १९ वर्ष वयोगटातील २१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.त्यातील १२ खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
सदर खेळाडूंना गुरुकुलातील क्रीडा प्रशिक्षक श्री.प्रविण घोगरे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या या यशाबद्दल स्तुतीसुमने उधळली.गुरुकुलाचे उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे,तसेच गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील,मुख्याध्यापक योगेश सोनवणे व राहुल नरोडे,संकुल प्रमुख तथा विश्वस्त प्रकाश भामरे,कार्यालयीन अधिक्षक प्रमोद शेलार,प्रशिक्षक प्रविण घोगरे व अमोल आहेर तसेच वसतिगृह अधीक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सदर विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here