Home Breaking News * नांदेड येथुन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी – ...

* नांदेड येथुन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी – नांदेड,दि, २७ ; राजेश एन भांगे

80
0

*

नांदेड येथुन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी –
नांदेड,दि, २७ ; राजेश एन भांगे

नवनिर्वाचित आमदार झाल्यानंतर आमदार मोहनराव हंबर्डे यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली होती, याबाबत त्यांनी जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कानावर ही बाब घालून दिल्यानंतर तडकाफडकी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नांदेड येथून उचलबांगडी करण्यात आली.

विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या मतदारसंघातील असून त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अनेक गोष्टींचा अभाव जाणवला. त्याठिकाणी रुग्णांची मोठी हेळसांड आणि स्वच्छतेचा अभाव या गोष्टी प्रकर्षाने जाणवत असल्याचे आमदार हंबर्डे यांनी सांगितले. त्यांनी ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदनाद्वारे यासंदर्भात 3 फेब्रुवारी 20 रोजी अधिष्ठाता डॉक्टर डॉ. मस्के यांची नांदेड येथून बदली करावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर दि.28 जून रोजी आमदार हंबर्डे हे औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये कोरोनाचा उपचार घेत असताना त्यांनी पालक मंत्री अशोक चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे अधिष्ठाता डॉ.मस्के यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आमदार हंबर्डे यांच्या नाराजीचा सूर संबंधितांना व्यक्त करून दाखविला होता. त्यानंतरही अधिष्ठाता डॉ. मस्के यांच्या कामांमध्ये कुठलीही सुधारणा दिसून आली नव्हती. या गोष्टीमुळे आमदार हंबर्डे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेऊन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथून अधिष्ठाता डॉ. मस्के यांची उचलबांगडी केली.

Previous articleव-हाणे सोनज ग्रामस्थांचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे* *कायदा हातात घेऊन बंधारा फोडण्याचा प्रयत्न;व-हाणे ग्रामस्थांचा विरोध*
Next articleबुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरोनाची लागन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here