*व-हाणे सोनज ग्रामस्थांचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे*
*कायदा हातात घेऊन बंधारा फोडण्याचा प्रयत्न;व-हाणे ग्रामस्थांचा विरोध*
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या सोनज्या डोंगरामागील आमराई जंगलातील बंधारा फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोनज ग्रामस्थांना कडाडून विरोध करताना आज व-हाणे ग्रामस्थ मंडळी दिसून आली.
याबाबतीत प्राप्त सविस्तर माहिती अशी की,व-हाणे व सोनज गावाच्या सीमारेषेवर सोनज्या डोंगर असून, या डोंगरामागे असलेल्या आमराई नावाच्या जंगलात तुंडूंब पाण्याने भरलेला एक बंधारा आहे.या बंधा-याच्या पाण्यावर व-हाणे ग्रामस्थ आपली शेती कसत असतात. या बंधा-यातून व-हाणे गावाला शेती व इतर कामासाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाट चारीचे काम यापुर्वीच पुर्ण करुन घेण्यात आलेले आहे.आणि यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस होत असल्यामुळे हा बंधारा तुंडूंब भरलेला आहे.त्यामुळे व-हाणे गावाचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला असतानाच आज सकाळी मात्र सोनज गावातील नागरिकांनी डोंगरामागील हा बंधारा पोकँलन मशिनच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याने व-हाणे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली व नागरिक तात्काळ बंधारा स्थळावर पोहचली.या घटनेची माहिती मिळताच मालेगांव पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाचे अभियंता शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा!मात्र मात्र भविष्यात या पाणीप्रश्नावरुन व-हाणे व सोनज ग्रामस्थांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे आतापासूनच निर्माण झालेली आहेत.
Home Breaking News व-हाणे सोनज ग्रामस्थांचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे* *कायदा हातात घेऊन बंधारा फोडण्याचा प्रयत्न;व-हाणे...