Home महाराष्ट्र अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ हवामान...

अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ हवामान राहणार तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता..

104
0

राजेंद्र पाटील राऊत

अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ हवामान राहणार तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पुणे मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान राहणार असून तूरळक ठिकाणी हलक्‍या सरी पडत आहेत येत्या रविवार दिनांक 10 जानेवारी पर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. राज्यासह देशातील हवामानात बदल होत आहे त्यातच मागील तीन दिवसांपासून अरबी समुद्राचा मध्य भाग व वायव्य भाग ते पूर्व राजस्थान सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्रीवादळ साठी पोषक वातावरण तयार होत आहे तर पूर्व राजस्थान व परिसरात चक्रीवादळसाठी पोषक स्थिती आहे. दक्षिणेकडील दक्षिण श्रीलंका ते आंध्र प्रदेश चा दक्षिण भाग व उत्तर तमिळनाडू या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम थंडीवर होणार आहे.राज्यातील जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडीत चढ-उतार असून किमान तापमानात वाढ झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दहा अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील किमान तापमान 15 ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पुढील आठवडाभर राज्यात थंडी कमी-अधिक स्वरूपाची राहणार आहे. 5 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नांदेड येथे नीचांकी 15.0 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नगर औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशीम यवतमाळ इत्यादी ठिकाणी आज हलक्या पावसाची सरी पडण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Previous articleअवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच, पुरेसे बळ उपलब्ध करून देणार ; विभागीय आयुक्त रा.गमे यांची सूचना
Next articleआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here