• Home
  • अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच, पुरेसे बळ उपलब्ध करून देणार ; विभागीय आयुक्त रा.गमे यांची सूचना

अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच, पुरेसे बळ उपलब्ध करून देणार ; विभागीय आयुक्त रा.गमे यांची सूचना

अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच, पुरेसे बळ उपलब्ध करून देणार ; विभागीय आयुक्त रा.गमे यांची सूचना

विशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे

नाशिक, दि.७ – शहरासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत अवैध धंद्यांवर पोलीस विभागा मार्फत कारवाई केली जाईल तसेच त्या त्या विभागास संबंधित प्रकरणात कारवाई करावयाची असल्यास त्यासाठी पोलीस प्रशासना कडून पुरेसे बळ उपलब्ध करून दिले जाईल, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
ऑनलाईन जुगार, मद्यविक्री-वाहतूक यावर कारवाईची जबाबदारी त्यासंबंधीचे परवाने देणाऱ्या संबंधित विभागांची असल्याची भूमिका पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घेतली होती.
यामुळे अन्य शासकीय विभागात अस्वस्थता होती.
याबाबत भा.ज.पा.च्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गृहमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे तक्रार करत शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बोट क्लब येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी अवैध धंद्यावरील कारवाई संदर्भात कोणताही संभ्रम न करता अशी कारवाई प्रचलित पद्धतीनुसार पोलीस विभागाने करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले होते.
त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली.
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर , जिल्हा सरकारी वकील अजय मिसर आदी उपस्थित होते.
विभागात पोलीस यंत्रणा अवैध धंद्यांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई करत आहे.
अशा प्रकारे शहर पोलिसांनी देखील कारवाई करावी असे निर्देश श्री गमे यांनी दिले.

anews Banner

Leave A Comment