Home परभणी अवैद्य वाळू उपसा थांबवण्यासाठी आमरण उपोषण

अवैद्य वाळू उपसा थांबवण्यासाठी आमरण उपोषण

34
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0021.jpg

अवैद्य वाळू उपसा थांबवण्यासाठी आमरण उपोषण

युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क (ब्युरो चीफ: शत्रुघ्न काकडे पाटील)

प्रतिनिधी :-परभणी(जिंतूर)
जिंतूर तालुक्यातील सावळी बु. येथील शासनमान्य वाळूच्या घाटावरुन बोट व जेसीबीच्या साहाय्याने हात असलेला बेकायदेशीर वाळूचा उपसा तात्काळ थांबवा. यासाठी रिपब्लीकन सेना शाखा जिंतूरच्या वतीने येथील तहसिल कार्यालयासमोर बुधवार १८ मे पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
शासनाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने घालुन दिलेल्या नियमांच्या अधीन राहुन वाळू उपसा करण्यास लिलावा द्वारे मान्यता दिली आहे. परंतु तालुक्यातील सावळी बु. येथील घाटातुन मात्र शासनाच्या सर्व नियमांना बगल देऊन कंत्राटदार बेसुमारपणे जेसीबी व बोटी च्या साहाय्याने वाळूचा उपसा करीत आहेत. ही शासनाची दिशाभुल असुन अशा प्रकारे होत असलेला. अवैध वाळूचा उपसा त्वरीत थांबवावा. प्रत्येक वाळुघाटावर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवावेत. रात्रीच्या वेळी करण्यात येत असणारी रेतीची वाहतुक व उपसा थांबवण्यात यावा. रेती उपसावर नियंत्रण ठेवण्याकडे दुर्लक्षित करत असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी असे रिपब्लीकन सेनेच्या वतीने सोमवार २ मे रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. परंतु तेंव्हा पासुन बुधवार १८ मे पर्यंत मागण्या पुर्ण न केल्याने उपोषणकर्ते रिपब्लीकन सेनेचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण यांनी तहसिल कार्यालयासमोर १८ मे पासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Previous articleवरवट बकाल मध्ये घडले हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन नमाज पठणाचा अर्थ समजावल्या गेले उपस्थितांना.
Next articleआता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध! राष्ट्रवादीला मोठा दिलासा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here