Home बुलढाणा वरवट बकाल मध्ये घडले हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन नमाज पठणाचा अर्थ समजावल्या...

वरवट बकाल मध्ये घडले हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन नमाज पठणाचा अर्थ समजावल्या गेले उपस्थितांना.

58
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0024.jpg

वरवट बकाल मध्ये घडले हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन

नमाज पठणाचा अर्थ समजावल्या गेले उपस्थितांना.                    संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क)

संग्रामपूर मधील वरवट बकाल येथील जामा मसजीत मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ईद महिन्याच्या 1 महिन्याचे रोजे उपवाच्या महिन्यानंतर येथील मुस्लिम बांधवानी गावातील असंख्य नागरिकांना जशी आपण लग्नाची किंवा एखाद्या कार्यक्रमाची पत्रिका किंवा कार्ड छापून इतरांना आमंत्रित करतो नेमकं त्याच पद्धतीने सध्या मराठी मध्ये पत्रिका छापून असंख्य गावकरी नागरिकांना शिरखुरम्यास केले आमंत्रित….
आज दि. 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 8 वाजेपासून जामा मस्जिद वरवट बकाल येथे जामा मस्जिद ट्रस्ट च्या वतीने ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी प्रमुख उपस्थितीत तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पोलीस निरीक्षक उलेमाले, सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, जि प चे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार, विदर्भ कोकण बँक शाखा व्यवस्थापक गाडे साहेब ,रामविजय बुरुंगले(शेगाव), अभय मारोडे, प्रल्हाद दातार, पत्रकार रामेश्वर गायकी सह.असंख्य समाजबांधव मित्रमंडळी हजर होते. या कार्यक्रमात मुफ्ती जुनेद, इशतियाक अहेमद, मौली महेमुद, हाजी इमरान, मुफ्ती समी यांनी अजान, नमाज, रोजा व ईद या महत्वाच्या विषयावर विस्तृत माहिती दिली. काही विघ्नसंतोषी देशाची अमन व शांती भंग करीत असून आपण सर्वांनी कुणाला कुठलाही त्रास न देता, कुणावरही अन्याय न करता कुणाचे हक्क न मारता दुसऱ्यांच्या सुख, दुःखात सहभागी होऊन सण, उत्सव साजरे करून देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी देशाची अमन व शांती भंग करणाऱ्यांना बळी पडू नका असे आव्हाहन मुफ्ती जुनेद यांनी केले.
आझान हा अरबी शब्द नसून तो संस्कृत शब्ध आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे देवाची आराधना एचढाच ,तसेच मोहम्मद अकबर हा कोणी तिर्हाईत मुस्लिम नसुन तो शब्ध नुसता देवाला म्हटला आहे,असे अनेक अर्थ समजावून मस्जिद मध्ये आराधना करण्यास सर्वांना परावृत्त केले, आणि आपण सर्व जण मिळुन सर्व सन उत्सव साजरे करू असा संदेश आज लोकांना दिला.
तसेच इशतियाक अहेमद यांनी सांगितले धार्मिक सलोखा व मानवता जिवंत ठेवण्यासाठी आपसातील मतभेद विसरून चुकले असेल तर माफी मागा व माफ करून टाका. मुफ्ती जुनेद यांनी अजान व नमाज वर विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी फरसाण व शिरखुरमा चा आस्वाद घेतला.
यावेळीं तालुक्यातील व गावातील सर्व पक्षीय, धर्मीय शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशविश्वेसाठी पत्रकार शेख अनिस, शेख मुशताक, जलील सर, मकसूद अली, साबीर साहेब, आणि त्याचे सहकारी असंख्य मुस्लिम बांधव यांनी खुप परिश्रम घेतले.

Previous articleदेवळा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Next articleअवैद्य वाळू उपसा थांबवण्यासाठी आमरण उपोषण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here