Home जळगाव जादूटोणा विरोधी कायदा जन संवाद यात्रा निमित्ताने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मार्गदर्शन

जादूटोणा विरोधी कायदा जन संवाद यात्रा निमित्ताने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मार्गदर्शन

162

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-064614_WhatsApp.jpg

जादूटोणा विरोधी कायदा जन संवाद यात्रा निमित्ताने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मार्गदर्शन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-  ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे जादूटोणा विरोधी कायदा जन संवाद यात्रा निमित्ताने ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन अध्यादेश 2013’ संदर्भ नंदिनी जाधव (पुणे )राज्यकार्यकारणी सदस्य यांनी मार्गदर्शन केले.
एफ आय आर दाखल करताना कोणती काळजी घ्यावी, काय टाळावे, पुरावे कोणते द्यावे पंच वेगवेगळे असावे याबाबत पोस्टर चित्रा च्या सहकार्याने कायदा समजावून सांगितला, तर मिलिंद देशमुख यांनी कायदा च्या तरतूदी संदर्भात डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी 17 वर्षे पाठपुरावा केला त्यांची हत्या झाल्यानंतर हा कायदा आठ दिवसांत मंजूर करण्यात आला होता.
आज या कायद्याच्या संदर्भात म्हणावे तसे गुन्हे दाखल केले जात नाहीत जे केले जातात ते एफ आय आर मधील त्रुटी मुळे सुटतात असे सांगितले. भगवान रणदिवे यांच्या सहकार्याने पाण्याचा दिवा पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी पेटवून उद्घाटन केले.
प्रास्ताविक प्रा गौतम निकम यांनी केले तर आभार नीता सामंत यांनी मानले ,शहर पोलिस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते तसेच डॉ पायल पवार,वैशाली निकम, प्रा विजया चव्हाण, विजया ठाकूर,उमा चव्हाण, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleदेगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषण
Next articleमराठा आरक्षण प्रश्र्नी आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.