Home नांदेड देगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषण

देगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषण

66
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-064054_WhatsApp.jpg

देगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषण

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

देगलूर दि.30/10/2023 सोमवार आज रोजी देगलुर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी लोकशाही च्या उपोषण मार्गाने शिव श्री मनोज जरान्गे जी लढा देत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज देगलुर व तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने निदर्शने व साखळी उपोषणासाठी बैठक काल 29/10/2023 रोजी संपन्न झाली . आज दि. 30/10/2023 रोजी मोठय़ा संख्येने समाज बांधव व महिला भगिनी नी मा . सहाय्यक जिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक देगलुर प्रशासकिय यंत्रणेला साखळी उपोषणाचे रितसर निवेदन दिले आहे. उदया मंगळवार दि.31/10/2023 पासुन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर , अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ साखळी उपोषण करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला भगिनि, शेतकरी , कष्टकरी , कर्मचारी , व्यापारी , तरूण , युवा , जेष्ठ नागरिक , मजुर , वकील , डॉक्टर्स सह सर्व क्षेत्रातील समाज बांधवांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here