Home पुणे आता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध! राष्ट्रवादीला मोठा दिलासा.

आता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध! राष्ट्रवादीला मोठा दिलासा.

25
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220518-WA0008.jpg

आता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध!

राष्ट्रवादीला मोठा दिलासा.

भोर (जीवन सोनवणे युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क) : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. छाननी प्रक्रियेत बाद (अवैध) झालेले ९ अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी वैध ठरविले आहेत, त्यामुळे त्या नऊ जणांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साखर आयुक्त कार्यालयात निवडणूकीच्या छाननप प्रक्रियेच्या विरोधातील पहिली सुनावणी मंगळवारी (ता. १० मे) पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने आपली बाजू मांडली, तर गुरुवारी (ता.१२ मे) दुसऱ्या सुनावतीत कॉंग्रेस म्हणजे आमदार संग्राम थोपटे गटाकडून बाजू मांडण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता.१७ मे) प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) दिलेल्या निर्णयामुळे आता १७ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान, बुधवारी (ता. १८ मे) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. साखर आयुक्तांनी दत्तात्रेय पांगारे व सुरेश खुटवड यांचे छाननी प्रक्रियेतील अवैध केलेले अर्ज पुन्हा अवैध ठरविले आहेत. अपिलानंतर अर्ज वैध ठरलेलेl उमेदवार पुढीलप्रमाणे ः विलास अमृतराव बांदल, अलका मालुसरे, मनोज निगडे, ज्ञानेश्वर पांडुरंग बागल, दिलीप महादेव रेणुसे, शिवाजी शहाजी बांदल, राजाराम दगडू कांबळे, राजेश गोविंद राऊत व रामचंद्र कुडले आदी उमेदवार आपले नशिब राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजमावणार आहेत.

आता परिवर्तन अटळ..राजगडच्या निवडणूक छाननीत बाद ठरलेले अर्ज वैध! ठरल्या नंतर ग्रामीण भागात चर्चा रंगताना दिसते.

Previous articleअवैद्य वाळू उपसा थांबवण्यासाठी आमरण उपोषण
Next articleरस्त्यावरील लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here