Home Breaking News 🛑 शेअर बाजार ; निर्देशांकातील तेजीला ब्रेक अन् नफेखोरी जोरात 🛑

🛑 शेअर बाजार ; निर्देशांकातील तेजीला ब्रेक अन् नफेखोरी जोरात 🛑

96
0

🛑 शेअर बाजार ; निर्देशांकातील तेजीला ब्रेक अन् नफेखोरी जोरात 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 21 ऑगस्ट : ⭕ करोना रुग्णांची वाढती संख्या,अमेरिका आणि चीनमधील वाढत्या संघर्षाने निर्माण झालेली अनिश्चिततेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात नफावसुलीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची घसरण झाली असून तो . तर निफ्टी देखील ७४ अंकांची घसरण झाली आहे. तो सध्या ११३३३ अंकांवर आहे.

सध्या बाजारात बँका , वित्त संस्था, ऑटो क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु आहे. व्होडाफोन, अशोक लेलँड, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, आयडीएफसी बँक, महिंद्रा, मारुती, बजाज फिनसर्व्ह, टायटन, ओएनजीसी, इंडसइंड बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे बुधवारच्या व्यापारी सत्रात निर्देशांकांत तेजी दिसून आली. निफ्टीने २३.०५ अंकांच्या वृद्धीसह ११,४०८.४० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ८६.४७ अंकांची वाढ घेत ३८,६१४.७९ वर विश्रांती घेतली. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की बँकिंग आणि वित्तीय, ऊर्जा, तसेच इन्फ्रा सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. तर आयटी, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रात नकारात्मक ट्रेंड दिसून आला. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५८ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.१६ टक्के वृद्धी दिसून आली.

डॉ. रेड्डीस लॅबोरटरीज लिमिटेड: कंपनीने फुजीफिल्म तोयमा केमिकल कॉ. लिमिटेडबरोबर जागतिक परवाना देण्याच्या कराराचा एक भाग म्हणून एव्हीगन (फेव्हिपीरावीर) २०० मिलीग्राम टॅबलेट भारतात लाँच केल्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी ०.५२ टक्क्याची वाढ झाली.

मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड: मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये ६.४३ टक्क्याची वाढ झाली. कंपनीने सध्याच्या आर्थिक वर्षात अंदाजे ४०५ कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळवल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: आरआयएलचे शेअर्स ०.८७ टक्क्यानी वाढले आणि शेअर २,१३७ रुपयांवर बंद झाला. कंपनीने नेटमेड या ऑनलाइन फार्मसी डिलिव्हरी स्टार्टअपमधील बहुतांश इक्विटी स्टेक संपादित केल्याची घोषणा केली.

सीएसबी बँक लिमिटेड: कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५३.६ कोटी रुपये झाला तर बँकेचे उत्पन्न ७४.३ कोटी रुपये झाले. परिणामी कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी १२.९२ टक्क्याची वृद्धी झाली व तो २२५.०५ रुपयांवर बंद झाला.⭕

Previous article🛑❗बबडया खरंच सुधारला आहे….! महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट ❗
Next article🛑 विद्यार्थ्यांना भरावा लागेल डिक्लेरेशन फॉर्म; कशी होणार परीक्षा जाणून घ्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here