Home पुणे पुणे जिल्ह्यात ‘जिलेटिन’ कांड्याच्या स्फोटाने खळबळ; १ किलोमीटरपर्यंत हादरे, दोघांना अटक 🛑

पुणे जिल्ह्यात ‘जिलेटिन’ कांड्याच्या स्फोटाने खळबळ; १ किलोमीटरपर्यंत हादरे, दोघांना अटक 🛑

91
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पुणे जिल्ह्यात ‘जिलेटिन’ कांड्याच्या स्फोटाने खळबळ; १ किलोमीटरपर्यंत हादरे, दोघांना अटक 🛑
✍️ सासवड 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

दिवे/सासवड –⭕ झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील झेंडेमळ्यात जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट झाल्याने झेंडेवाडी परिसरात मोठा हादरा बसला.

या स्फोटाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणावर असल्याने आर.टी.ओ जवळ असणार्‍या हॉटेल मल्हार वाडा जवळ, आरटीओ रोड लगत, झेंडेमळाच्या परिसरात झालेल्या स्फोटाने सवाई हॉटेलला देखील तडे गेले आहेत. व एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

स्फोटामुळे एक किलोमीटर परिसरात हादरा बसल्याचे काही नागरिकांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

याप्रकरणी कालीदास संपत झेंडे (रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनी याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून गणेश जयसिंग सरक (रा. मिरगाव, ता. फलटण, जि. सातारा) व खाडे (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध रविवारी (दि. २८) रात्री ११:३० वाजता गुन्हा दाखल झाला आहे. दोघांपैकी गणेश सरक या आरोपीस अटक केली आहे.⭕

अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रविवारी दुपारी 3 च्या सुमारासकालिदास संपत झेंडे यांच्या हॉटेल च्या मागे शेताच्या बांधावर जिलेटिन कांड्याचा स्फोट झाल्याने झेंंडे यांचे मल्हार वाडा हॉटेल व शिवाजी विश्‍वास कटके यांच्या मारुती इको गाडी नंबर (एम एच 12 टी. एच 0812) हिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तसेच सवाई हॉटेलचे भिंतींना आतून तडे गेले आहेत. म्हणून आरोपी गणेश जयसिंग सरक (रा. मिरगाव ता. फलटण जि. सातारा) याने बेकायदा जिलेटीनच्या कांड्या इंदापूर येथील खाडेकडून घेऊन ताब्यात बाळगल्याने जिलेटिन सारखा पदार्थ कोणतीही दक्षता न घेता हायगईने ठेवल्यामुळे जिलेटिन च्या स्पोटाचा व नुकसानीला कारणीभूत झाल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.

दुपारच्या दरम्यान भला मोठा आवाज ऐकू आला त्यानंतर आम्ही परिसराची पाहणी केल्यानंतर हॉटेल मल्हार गड च्या पाठी माघे स्फोट झाल्याचे कळाले यानंतर आमच्या हॉटेलची पाहणी केली असता हॉटेल मधील भिंतींना देखील तडे गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
(अजित गोळे, हॉटेल सवाईचे मालक). ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here