• Home
  • मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, कोरोनाला दूर ठेवा! ⭕

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, कोरोनाला दूर ठेवा! ⭕

⭕ मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, कोरोनाला दूर ठेवा! ⭕


( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस सुरू असल्याने जगभरात सुरू असलेल्या संशोधन अहवालातून विविध प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. कारण या गोष्टी संशोधनानंतर सिद्ध केल्या जात असल्या तरी त्या नाकारल्या जाऊ शकत नाहीत. एडिनबर्ग विद्यापीठात असेच एक संशोधन करण्यात आले आहे. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या संशोधनात जे समोर आले आहे ते भारतीय परंपरा आणि तिची मूल्ये अधिक दृढ करताना दिसताय. या संशोधनात असे म्हटले की, कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्यास कोरोनाचा बचाव केला जाऊ शकतो. या संशोधन अहवालाद्वारे संशोधकांनी लोकांना याचा वापर करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

तसेच, सर्दी-घसा, खोकल्यापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर सहसा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करण्याचा सल्ला देतात, आता ही थेरपी कोरोना रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या माहितीनुसार, एडिनबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधनानंतर हे सिद्ध केले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मीठ गरम पाण्याने गुळण्या केल्यास कोरोनास प्रतिबंध केले जाते, जर हा उपाय रुग्णांनी केल्यास त्यांची प्रकृती लवकर सुधारण्याची शक्यता निर्माण होते. जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, त्यात रोगाशी लढण्याची क्षमता वाढून कोरोना संसर्गावर प्रभावी परिणाम देखील होतो.
भारतीय परंपरेचा भाग असणारा ‘हा’ उपाय!

एडिनबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाबाधित ६४ लोकांवर संशोधन केले. यापैकी ३२ लोकांना दररोज १२ वेळा मीठ-पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला. या संशोधनानंतर शास्त्रज्ञांना असे आढळले की, ज्यांनी हा उपाय केला ते लोकं इतरांपेक्षा लवकर बरे झाले. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करण्याची पद्धत प्राचीन काळापासून भारतीय परंपरेचा एक उपाय तर आहेत मात्र हा आयुर्वेदाचा एक भागही मानला जातो. अशाप्रकारे गुळण्या केल्यास घशाच्या दुखण्यापासून आराम मिळून घसादेखील मोकळा होतो. याशिवाय कोमट पाणी पिण्यामुळे तोंडातील विषारी घटक देखील स्वच्छ होतात, असे सांगण्यात येत आहे.

anews Banner

Leave A Comment