⭕ अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका ! ⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई : गँगस्टक अरूण गवळीला हायकोर्टाने मोठा दणका दिलेला आहे. अरूण गवळीला पॅरोल वाढवून मिळणार नाही तसंच ताबडतोब तळोजा जेलला सरेंडर व्हा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निर्देश दिलेले आहेत.
अरूण गवळीच्या मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. या विवाहासाठी त्याला पॅरोल देण्यात आला होता. मात्र अरूण गवळीने पॅरोल वाढवून मिळावा, अशी मागणी केली होती. यावेळी माझी गेल्या काही दिवसांतली वागणूक चांगली आहे, असं कारण देत गवळीने पॅरोलमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
अरूण गवळीची मागणी न्यायालयाने नाकरली आहे. एवढंच नाही तर नागपुरच्या सेंट्रल जेलमध्ये असणाऱ्या अरूण गवळीला तळोजाच्या जेलला सरेंडर होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
दुसरी कडे पॅरोल वाढवून देण्यासाठी फक्त वागणूक चांगली आहे हे एकमेव कारण असू शकत नाही तसंच अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही, असं देखील न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.
