Home नांदेड मुखेड तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी कडून 21 लाख रुपयांची...

मुखेड तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी कडून 21 लाख रुपयांची वसुली..

207

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी कडून 21 लाख रुपयांची वसुली..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड. मुखेड तालुक्यात 43 हजार लाभार्थी पैकी 3224 अपात्र लाभार्थी.आज दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यातील 43 हजार 884 शेतकऱ्यांना बँक खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून जमा करण्यात येते. त्या 3224 शेतकरी लाभार्थी अपात्र असल्यामुळे महसूल विभाग मोहीम सामाजिक अंक क्षणात समोर आले आहे. यातील अपात्र असून सुद्धा लाभ घेतलेल्या 238 इन्कम टॅक्स पे करणारे व इतर अपात्र लाभार्थी कडून 21 लाख 60 हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.उर्वरित लाभार्थ्यांकडून तात्काळ तपासणी मोहिमेअंतर्गत वसुलीचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या खात्यात धनादेश किंवा रोख रक्कमेद्वारे परत करावी.भरणा न केल्यास शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल असे मुखेडचे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी सांगितले आहे. योजनेतील अपात्र लाभार्थ्यांनी यापुढे नोंदणी करू नये ज्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांनी तलाठी यांच्यामार्फत शासनाकडे रक्कम जमा करावी मुखेडचे नायब तहसीलदार महेश हांडे सर यांनी सांगितले आहे या योजनेची जबाबदारी मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील सर व नायब तहसीलदार श्री महेश हांडे सर यांची असून हयगय करणाऱ्या वर कारवाई केली जाईल असे महसूल प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे यातील अपात्र लाभार्थ्यांनी तात्काळ रक्कम जमा करावी असे आवाहनही महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमहसूल जत्रेत पाणंद व वाहिवटीचे रस्ते खुले
Next articleयशवंत सेना नासिक जिल्हा दिनदर्शिका प्रकाशन व उर्वरित कार्यकारणी निवड सरसेनापती माधवभाउ गडदे यांच्या हस्ते जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.