Home कोल्हापूर महसूल जत्रेत पाणंद व वाहिवटीचे रस्ते खुले

महसूल जत्रेत पाणंद व वाहिवटीचे रस्ते खुले

136
0

राजेंद्र पाटील राऊत

महसूल जत्रेत पाणंद व वाहिवटीचे रस्ते खुले

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या महसूल जत्रेत ज्या ज्या गावांमध्ये सध्या निवडणुका आहेत, ती गावे वगळून उर्वरीत गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राधानगरी तालुक्यातील हडकुळी पाणंद, भुदरगड तालुक्यातील नाझरे वसाहत दरम्यानचा ७०० मीटर पाणंद रस्ता आणि पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्ह्यात महसूल जत्रा सुरु करण्यात आली आहे. या जत्रे अंतर्गत १२२५ गावांमध्ये किमान एका गावातील अतिक्रमण काढून पाणंद रस्ता वहिवाटीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यानुसार गावांमधील पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने, सर्वसंमतीने आणि सामंजस्याने खुले करण्यात येत आहेत.
कसबा वाळवे मंडळातील मौजे माजगाव ता. राधानगरी मधील हडकुळी पाणंद रस्ता खुला करण्यात आला आहे.
मौजे मानवळे तालुका भुदरगड येथील भांडेबांबर पैकी नाझरे वसाहत ते सुतार शेत नदीकाठ एकूण सातशे मीटर पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना खुला करुन दिला आहे.
पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करुन दिला.
दुसऱ्या टप्यात १५ जानेवारीनंतर ऊर्वरीत गावांमधील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ते खुले करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करुन ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी मानले आहेत.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleमतदार आमिषाचे बळी
Next articleमुखेड तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी कडून 21 लाख रुपयांची वसुली..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here