Home महाराष्ट्र मतदार आमिषाचे बळी

मतदार आमिषाचे बळी

120
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे २६ डिसेंबर⭕( युवा मराठा न्युज पुणे ब्युरो चीफ सिध्दांत चौधरी
सह पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप)⭕

मतदार आमिषाचे बळी

**15-20लाखांचे आमिष दाखवून निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान कशासाठी?
(योग्य व्यक्तीला निवडून द्या असे आव्हान करा)रोक* ठोक*
सद्या ग्रामीण भागात निवडणुकीचा हंगाम तेजीत सुरू झाला आहे, निवडणूक फॉर्म भरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून,अशातच अनेक पुढारी,आमदार यांचा गावातील निवडणूक लढा व लखोत बक्षीस मिळवा अशी ऑफर देत असून ग्रामपंचायत बिनविरोध करा अशी आव्हाने देत आहे.पण ती आव्हाने आज पिढीला कितपत खरी आहेत व कितपत खोटी आहेत हे गावकऱ्यांनी,तरुण पिढीनी ओळखायला हव्यात.या निवडणुकीत कोणीही जात,धर्म,व्यवहार न आणता समाजासाठी विचारपूर्वक काम करणाऱ्या तरुणांना निवडून द्या असे आव्हान कोणी करताना मात्र दिसत नाही लोकशाही चां सगळ्यात मोठा स्तंभ तो म्हणजे निवडणूक होय,विचारांची मांडणी,सामाजिक कार्य त्यांची क्रांती म्हणजे निवडणूक होय.जातीच्या नावावर धर्माच्या नावाखाली निवडणूक लढणे म्हणजे लोकशाही का?असा प्रश्न,असा विचार आजच्या तरुण पिढीनी केला पाहिजे. व तितकेच महत्त्वाचे म्हणजे सतर्क राहून काम सुरू केले पाहिजे. म्हणून गावकऱ्यांनी,तरुण पिढीनी कुटल्याही प्रलोभन ना बळी न पडता निर्भिड पणे योग्य उमेदवाराला निवडून द्यावे, व सामाजिक कार्यात झोकून काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून येण्याची संधी दिली पाहिजे.जर कोणत्याही अमिषाला किंवा बक्षिश यांना बळी पडला तर असे म्हणावे लागेल, *ऐक वाटी रस्सा आणि 5 वर्ष गप्प बस्सा* मात्र असे काही होणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी,तरुण पिढीनी घेतली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here