Home गडचिरोली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना विजयी करा आमदार डॉक्टर...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना विजयी करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे पदवीधर

134

आशाताई बच्छाव

Screenshot_20220902-154140_Google.jpg

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना विजयी करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे पदवीधर मतदारांना आवाहन                                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार)

गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) निवडणुक दिनांक ४ सप्टेंबरला सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान होणार

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अधीसभेतील (सिनेट) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन बहुमताने विजयी करावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गोंडवाना विद्यापीठातील पदवीधर उमेदवारांना केले आहे

दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता पासून सायंकाळी ५ वाजता पर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. यात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या वतीने खुल्या प्रवर्गातून प्रशांत रामन्ना दोंतुलवार, मनोज राजेश्वर भूपाल, सागर विनायक वाजे, यश अनिलराव बांगडे, स्वरूप सुभाष तारगे, तर राखीव प्रवर्गातून जयंत मारोतराव गौरकर, योगिता दिगंबर पेंदाम (डबले) ,गुरुदास मंगरुजी कामडी, धर्मेंद्र ज्ञानदेव मुनघाटे व किरण संजय नागपुरे उमेदवार असुन या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी पदवीधर मतदारांना केले आहे.