Home पुणे पिंपळे गुरवमध्ये यशोदा पुरंम सोसायटीत शॉर्ट सर्किटमुळे आग सोसायटीच्या सातव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये...

पिंपळे गुरवमध्ये यशोदा पुरंम सोसायटीत शॉर्ट सर्किटमुळे आग सोसायटीच्या सातव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये लागली आग फ्लॅटमधील सर्व साहित्य सामग्री जळून खाक

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0033.jpg

पिंपळे गुरवमध्ये यशोदा पुरंम सोसायटीत शॉर्ट सर्किटमुळे आग
सोसायटीच्या सातव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये लागली आग
फ्लॅटमधील सर्व साहित्य सामग्री जळून खाक             पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)
पिंपळे गुरव येथील सारंग चौधरी यांनी स्वप्नातले एक घर काही वर्षांपूर्वी लोन काढून घेतले होते. या घरात पती पत्नी आणि मुलगा आनंदाने वास्तव्य करीत होते. नुकतेच गणपतीही घरी आले होते. यानिमित्त गावाहून आई वडीलही आले होते. मात्र काळाने क्षणार्धात सर्व संसार उध्वस्त केला. यावेळी अचानक राहत्या घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून सर्व काही जळून खाक झाले होते.
नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील साईनाथ नगर मधील यशोदा पुरंम सहकारी गृहरचना संस्था सोसायटीमध्ये गुरुवार (दि. १) रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही आग इमारतीच्या सातव्या मजल्यावरील बी विंग मधील ७०१ नंबरच्या सदनिकेत लागली होती. आगीत सदनिकेतील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही.
येथील सोसायटीत गणेशोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. यावेळी आग लागलेल्या फ्लॅट मधील सारंग चौधरी, त्यांची पत्नी, मुलगा, आई वडील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खाली आले होते. रात्री दहाच्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावरून धूर पसरत असल्याचे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सोसायटीतील नागरीकांना आग लागत असल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित नागरिकांनी गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित राहटणी, वल्लभनगर अग्निशामक दलाला संपर्क करून कळविले.
यावेळी अग्निशामक दलाची तीन वाहने घटनास्थळी दहा वाजून पंचवीस मिनीटांनी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या २० ते २५ जवानांनी याप्रसंगी तत्परता दाखवत सातव्या मजल्यावरील आग लागलेल्या सदनिकेतील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. यावेळी आगीच्या ज्वाला इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे पहावयास मिळत होते. रात्री अकराच्या सुमारास अग्निशामक दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
यावेळी आग लागलेल्या फ्लॅट मधील फर्निचर, एसी, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप, ओव्हन, सोफासेट आदी साहित्य सामग्री जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे वल्लभनगर येथील अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन विकास नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी सोसायटीच्या इमारतीमधील सर्व सदनिकाधारक भयभीत होऊन रस्त्यावर उतरले होते. प्रसंगावधान राखण्यासाठी इमारतीच्या लिफ्ट, गॅस पुरवठा करणारी एमएनजीएल पाईपलाईन, वीज बंद करण्यात आली होती.
याप्रसंगी सोसायटीमधील नागरिकांना धीर देण्यासाठी स्थानिक चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, महेश जगताप, शिवाजी कदम, अजय दूधभाते, पोलीस नाईक राजू मछे उपस्थित होते. यावेळी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांचे तसेच सांगवी पोलिसांचे उपस्थित नागरिकांनी आभार मानले.

Previous articleश्रीकृष्ण मित्रमंडळ गणेशोत्सव आरतीला नारायण पवार यांची उपस्थिती
Next articleअखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना विजयी करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे पदवीधर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here