Home पुणे श्रीकृष्ण मित्रमंडळ गणेशोत्सव आरतीला नारायण पवार यांची उपस्थिती

श्रीकृष्ण मित्रमंडळ गणेशोत्सव आरतीला नारायण पवार यांची उपस्थिती

85
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0027.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे दि01/09/22 रोजी श्रीकृष्ण मित्र मंडळ खामगाव फाटा या ठिकाणी झालेल्या आरती च्या कार्यक्रमाला यवत पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नारायणजी पवार साहेब यांनी उपस्थिती दाखवली ते आल्यानंतर त्यांचे स्वागत हे लहान मुलांच्या लेझीम खेळाने करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्ण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून श्रींची आरती साहेबांच्या हस्ते करण्यात आली आरतीनंतर कासुर्डी गावचे सरपंच श्री विशाल टेकवडे यांच्यामार्फत पवार साहेबांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पवार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले हे करीत असताना त्यांनी सर्व कार्यकर्ते महिलावर्ग व लहान मुलांना गणपती आपण का बसवण्यास चालू केले याचे महत्त्व सांगितले हा एक सामुदायिक उपक्रम आहे यामध्ये सामाजिक बांधिलकी जपून आपण समाजासाठी सर्वांनी काहीतरी करणे गरजेचे आहे यामध्ये रक्तदान शिबिर असो वृक्षारोपण असो अशा सामाजिक उपक्रमांमध्ये आपण सर्वांनी सहभाग दाखवावा असे पवार साहेब म्हणाले त्याच बरोबर गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्यामुळे समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी मंडळाने प्रयत्न करावेत त्याच बरोबर कायद्याचे उल्लंघन न करता आनंदाच्या वातावरणात आपण सर्वांनी हा उत्सव साजरा करावा असे मनोगत व्यक्त करताना पवार साहेब म्हणाले राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र तसेच युवा मराठा न्यूज यांच्या निमंत्रणहास वेळ देऊन आपण आल्यामुळे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत नागणे यांनी श्री नारायणजी पवार साहेबांचे आभार व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here