Home बुलढाणा वान नदीपात्रातून होणारा अवैध रेती उपसा बंद करा वंचित युवा आघाडीची मागणी...

वान नदीपात्रातून होणारा अवैध रेती उपसा बंद करा वंचित युवा आघाडीची मागणी  कार्यवाही न झाल्यास आमरण ऊपोषणाचा ईशारा

162

आशाताई बच्छाव

IMG-20230624-WA0041.jpg

वान नदीपात्रातून होणारा अवैध रेती उपसा बंद करा वंचित युवा आघाडीची मागणी
कार्यवाही न झाल्यास आमरण ऊपोषणाचा ईशारा
स्वप्निल देशमुख ब्यूरो चीफ बुलढाणा

संग्रामपुर :-  दि 23/6/23 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष वान नदीपात्रा जवळ राहणरे व शेती असणारे शेतकरी यांच्या वतिने तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये असे नमूद केले आहे की गेल्या काही महिन्यांपासून वडगाव वान ते पातुर्डा वान नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असुन नदीपात्राच्या काठी असणारी शेती व गावे यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गावाकाठी सुध्दा मोठे मोठे खड्डे करुन गावात जाणारे रस्ते सुद्धा बंद केले तसेच पुढे दोन‌ ते तीन दिवसांत शाळा सुरू होत असल्याने लहान लहान मुले शाळेत जातात आणि रेतीने भरलेली वाहने रोडने सुसाट धावतात असं असताना सुध्दा शासन याकडे दुर्लक्ष का करते हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अधिकारी व वाळु माफीया यांच्यात काही साटेलोटे आहे अशी शंका निर्माण होत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ 8 दिवसांत वाळु माफीया वर कारवाई करावी अन्यथा वान नदीपात्राच्या खड्यात आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनातुन देण्यात आला. आशिष धुंदळे, सुनिल सोनोनै शत्रुग्न बाजोडे , रमेश धुंदळे , रतन बाबुळकर , राजरत्न तायडे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

Previous articleमाढ्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन
Next articleवडगाव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा यलगार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.