Home कोल्हापूर वडगाव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा यलगार

वडगाव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा यलगार

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0017.jpg

वडगाव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा यलगार
कोल्हापूर, राहुल शिंदे: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे निष्ठावंत कोल्हापूरजिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे वडगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
शिवसेनेचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पारंपारिक मतदारसंघ आहे.मतदार संघात शिवसेनेचे मोठी ताकद आहे.निष्ठावंत व मतदार संघात पक्षाला बळकट देण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनाच पक्षाने लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे वडगाव शहरातील सर्व शिवसैनिकांनी केली असल्याची वडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वडगांव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संदीप पाटील बाबा यांनी दिली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा मतदार संघ आहे व ठाकरे कुटुंबावर निष्ठा असणारे शिवसैनिकांसाठी उपरा उमेदवार नेहमीच लादला जात आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निष्ठावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना उमेदवारी द्यावी.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अण्णा साहेब बिल्लोरी, अंकुश माने, सुनील माने, राजू कवठेकर, अनिल माने, मिलिंद हंजे, सागर साखळकर, यासीर मोमीन, उमेश पाटील, आशिष पाटील, विकास कोळी, रोहन सुनगार्, भालचंद्र कोळी, सागर सावंत, सचिन यादव, विशाल पाटील, विशाल दोरकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here