Home Breaking News *नांदेडात कोरोना तीनसो पार” सहा महिन्याचा बालक कोरोना मुक्त, शुक्रवारी ४ ची...

*नांदेडात कोरोना तीनसो पार” सहा महिन्याचा बालक कोरोना मुक्त, शुक्रवारी ४ ची भर, ५ ला सुट्टी. उपचार सुरू असणाऱ्यांचे पुन्हा शतक पार* *नांदेड,दि १९ ; राजेश एन भांगे*

354
0

*नांदेडात कोरोना तीनसो पार” सहा महिन्याचा बालक कोरोना मुक्त, शुक्रवारी ४ ची भर, ५ ला सुट्टी. उपचार सुरू असणाऱ्यांचे पुन्हा शतक पार*
*नांदेड,दि १९ ; राजेश एन भांगे*
नांदेड जिल्ह्यातील शुक्रवार दि 19 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता आरोग्य विभागाने
प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार.. एकूण 48 पैकी 47 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, व एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 297 एवढी झाली होती.. परंतु रात्री 7 वाजण्याच्या सुमारास पुन्हा तीन महिला रुग्ण वाढल्याने जिल्ह्याचा एकूण आकडा आता तीनसो पार गेला आहे.

आज दिवसभरात आढळलेले चार रुग्णांमध्ये 1 पुरुष, 3 महिलांचा समावेश आहे.

✔️आज सापडलेल्या सदरील रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे :

☑️ सुंदर नगर, नायगाव येथील एक २३ वर्षाचा तरुण, जो रशियाहून नागपूरला विमानाने येऊन नांदेडला खाजगी वाहनाने दाखल झाला.
☑️मंडई, इतवारा, नांदेड येथील एक ४५ वर्षीय महिला, जी हैदराबादहून आली आहे.
☑️नाथनगर, नांदेड येथील एक १२ वर्षीय मुलगी, जी पुण्याहून नांदेडला आली आहे.
☑️ नाथनगर, नांदेड येथील एक १६ वर्षीय मुलगी, जी पुण्याहून नांदेडला आली आहे.

✅️आफवावर विश्वास ठेवू नका

सुंदर नगर नायगाव चा पत्ता असलेला 23 वर्षीय तरुण हा रशियाहुन नांदेडला काल आला होता , हॉटेल अतिथी नांदेड येथे कवारेन्टीन मध्ये होता. परदेशातून आला होता म्हणून त्याचा swab घे 18.6.2020 रोजी घेण्यात आला. तो पॉजिटीव्ह निघाला आहे. तो तरुण नायगाव ला आला ही नाही किंवा बाहेर देशातून आल्या नंतर नायगाव मध्ये त्याचे वास्तव्य नाही व नातेवाईकांचा संपर्क आला नाही अशी माहिती ता आरोग्य अधिकारी डाँ शेख बालन यांनी दिली* .

✅️आज एका ६ महिन्याच्या बालकांसह ४ रुग्ण बरे होऊन घरी ‘

नांदेडकरांसाठी 19 जून शुक्रवार हा दिवस थोडासा आनंदायी ठरला आहे, कारण आज “एका सहा महिन्याच्या चुकल्याने” कोरोनावर मात केली आहे. गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये रुग्णांचे वाढते आकडे पाहता नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण आजच्या दिवशी एका सहा महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर यशस्वी मात करून नांदेड करांसाठी जणू काय गुड न्यूजच दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मध्ये सध्या तरी दिलासादायक वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

शुक्रवार दिनांक 19 जून 2020 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार घेत असलेला 6 महिन्याचा बालक बरा झाल्यामुळे व तसेच डॉ. पंजाब भाव कोविड केअर सेंटर नांदेड येथील 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतचा रुग्णांची संख्या 186 एवढी झाली आहे.

आतापर्यंत 300 रुग्णांपैकी 186 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 101 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत. तर 6 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 4 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 300 वर.
☑️ दिवसभरात 5 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 186 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️13 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️101 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ 6 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.

शुक्रवार दिनांक 19 जून 2020 रोजी 87 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here