*कोथरूड चांदणी चौकात सापडले हसतमुख बाळ* पुणे,(सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- 19 जून 2020 संध्याकाळी सहाच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये खबर आली की चांदणी चौकात कोणीतरी लहान बाळ सोडून गेले आहे पोलिसांनी तात्काळ धाव घेत चांदणी चौकात पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झुडपाखाली हे गोंडस बाळ पाहिले त्या बाळाला कानाला वारा लागू नये थंडी वाजू नये म्हणून कानटोपी पांढरा ड्रेस घालून अंगावरती निळ्या कलरची शाल पांघरून कोणाची दृष्ट लागू नये म्हणून कपाळावर काळा टिळा लावलेला विशेष हेबाळ इतके गोंडस गोजिरवाणी असून कशी सोडून गेले अशी चर्चा बघ्यांमध्ये होती तसेच कोथरूड पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी सांगितले की हेबाळ चार महिन्याची मुलगी असून आम्ही या बाळास ससूनमध्ये दाखल करणार आहोत नागरिकांना या बाळा बद्दल काही माहिती असल्यास तात्काळ कोथरूड पोलीसा शी संपर्क करावा बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी जवळील आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक इतरांकडून माहिती मिळते का याचा शोध पोलीस घेत आहेत
