Home नांदेड कार्यकारी अभियंता लेंन्डी प्रकल्प विभाग देगलुर यांना शेतकर्‍यांच्या वतीने मुख्य कालवा प्रश्नी...

कार्यकारी अभियंता लेंन्डी प्रकल्प विभाग देगलुर यांना शेतकर्‍यांच्या वतीने मुख्य कालवा प्रश्नी दि

124

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0007.jpg

कार्यकारी अभियंता लेंन्डी प्रकल्प विभाग देगलुर यांना शेतकर्‍यांच्या वतीने मुख्य कालवा प्रश्नी दिले निवेदन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भुसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 9 खंड 3 व 4 अन्वये मुखेड तालुक्यात गेल्या अनेकव वर्षापासुन लेंन्डी प्रकल्पाचे काम सूरु आहे .या प्रकल्पाचा मुख्य कालवा हा सांगवी भादेव शिवारातुन गट.क्र. 143,144,142,137,140,145,165,164,163,162,172,173,180,179,176,177,178,186,175,181,185,182,183,184 पर्यंन्त शेतीतुन जातो ही जमीन अधिनीयम 1894 क्र.1 यांच्या कलम 4/1 नोटीस नुसार भुसंपादन अधिकार्‍यांने नोटीस दिल्या . व कलम 12/2 नोटीस नुसार जमीनी संपादन केल्या . ह्या कालव्याचे काम 2008 नंतर सुरुवात करते वेळी शेतकर्‍यांना त्यांची संपादीत केलेली जमीन मोजमाप करुन शिल्लक राहीलेली जमीन न दाखवता सुरुवात केली.

हा मुख्य लेंन्डी प्रकल्पाचा कालवा 180 फुट रुंदीचा असुन मुळात कालव्याचे काम करते वेळी संपादीत केलेली जमीन दोंन्ही बाजुची न घेता कमी जास्त प्रमामात खोदकाम केले असुन त्या कालव्याच्या बाजुच्या नालीचे काम कालवा खोदकाम करते वेळी करायला पाहीजे होत पण ते नकरता व शेतकर्‍यांच्या जमीनी शिल्लक मोजमाप न करुन देता मुख्य कालव्याचे काम पुर्णत्वाला गेले आहे .ज्या ठिकाणाहुन वर्षानुवर्ष पावसाचे पाणी वाहत होते ते पावसाचे पाणी त्याच ठिकाणाहुन प्रवाहीत न करता शेतकर्‍यांच्या शेतामधुन पाणी काढण्याचा अठ्ठाहास मुख्य कालवा अधिकारी करीत आहेत .सध्या कालव्याच्या सीमेंन्ट क्राँक्रेटचे काम पुर्ण होत आहे .
दर वर्षी शेतकर्‍यांच्या शिल्लक राहीलेल्या शेतात पाणी थांबुन शिल्लक राहीलेली जमीन सुध्दा पिकत नाही वेळोवेळी या संर्दभात कालवा अधिकार्‍यास सुचना देवुन सुध्दा ते मनमानी करत आहैत .
पहिलच शेतकर्‍यांच्या नशीबी संकटाचा डोंगर अन परत लेंन्डी प्रकल्प अधिकार्‍यांच्या वतीने मारत असलेले हातोडीचे घाव जर घातले तर बळिराजा जगणार कसा?
शेतकर्‍यांच्या संपादीत केलेल्या जमीनी 7/12 वर असलेली जमीन व्यवस्थित मोजमाप करुनच मुख्य कालव्याच्या बाजुच्या नालीचे काम करावे आपन स्वता लक्ष घालुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंम्ही शेतकरी आमचा प्रश्न मिटेपर्यंन्त उपोषणास बसु अस्या प्रकारचे निवेदन कार्यकारी अभियंता लेंन्डी प्रकल्प अधिकारी देगलुर यांना सर्व शेतकर्‍यांच्या वतीने काल देण्यात आले .

Previous articleकळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडुन ग्राहकाला मारहाण करून सुद्धा दुकानदारावर अद्याप कार्यवाही नाही!
Next articleभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीत विकास तिर्थ भव्य बाईक रँली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.