Home Breaking News 🛑 **मॅनेजर द्यायचा त्रास म्हणून दीड लाखांची सुपारी देऊन तोडले पाय** 🛑

🛑 **मॅनेजर द्यायचा त्रास म्हणून दीड लाखांची सुपारी देऊन तोडले पाय** 🛑

129
0

🛑 **मॅनेजर द्यायचा त्रास म्हणून दीड लाखांची सुपारी देऊन तोडले पाय** 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कंपनीत मॅनेजर त्रास देतो म्हणून एका तब्बल दीड लाखांची सुपारी देऊन चार गुंडांकडून मॅनेजरवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून एकाला कोरोनाची लागण असल्यामुळे रुग्णालयात हलवले आहे.30 जुलै रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत मारुती सुझुकी एस क्रॉस KA 51MK 53 45 मध्ये बसून डोंगशीन कंपनीमधून सीनियर जनरल मॅनेजर मुथया सुबय्या बडेदरा हे घरी जात होते.

त्यावेळी वाटेत मोटर सायकलवर आलेल्या दोघांनी गाडीची धडक दिली. त्यानंतर घटनास्थळी आणखी दोघे जण येवून हातात हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मॅनेजरला बेदम मारहाण केली. यात त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर करण्यात आले.

या प्रकरणी चार अज्ञात इसमवर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा तपास वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत होते.

तसंच दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा असताना पोलीस निरीक्षक  पद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकास दाखल गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तसंच टेक्निकल तपासाचा वापर करून माहिती घेऊन अत्यंत शिताफीने गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली.

त्यामधील करणकुमार चल्ला मत्तु (वय 23 रा. गांधीनगर देहुरोड, बालाजी रमेश मुदलीयार (वय 27 रा. MB कॅम्प देह रोड), राकेश शिवराम पेरूमल (वय 25 रा. MB कॅम्प देहुरोड) हे आरोपी यांना ताब्यात घेतले असून मुस्ताक जमील शेख (वय 25 रा. गांधीनगर देहुरोड) याला कोरोना  झाले असल्याने व उपचार घेत असल्याने ताब्यात घेण्याची तजवीज ठेवली आहे.

सदर आरोपींची सखोल चौकशी करता चौकशीमध्ये आशिष ओव्हाळ याने आम्हाला दीड लाखाची सुपारी दिली असल्याचे सांगितले. ‘मला एक डोण्गशीन कंपनीचा  मॅनेजर त्रास देत आहे तुम्ही त्याला फॅक्चर करा’ असे सांगून सुपारी दिली, असल्याची कबुली आरोपींनी दिली.

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत , पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,Asi विजय पाटील,हेड कॉन्स्टेबल प्रकाश  वाघमारे,सचिन गायकवाड, गणेश महाडिक  स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.⭕

Previous article🛑 एसटीच्या” स्मार्ट कार्ड ” योजनेला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ..! 🛑
Next article🛑 **सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी……! अजित पवारांवर**🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here