• Home
  • 🛑 **सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी……! अजित पवारांवर**🛑

🛑 **सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी……! अजित पवारांवर**🛑

🛑 **सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी……! अजित पवारांवर**🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ राष्ट्रवादीतून (NCP) भाजपात (BJP) गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) व्यूहरचना आखत आहेत. याबाबत बुधवारी शरद पवार, जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक झाली. या बैठकीत, युती सरकारच्या काळात राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपण्यात आली. यात जयंत पाटील त्यांना मदत करतील, असे ठरले.

राष्ट्रवादीत काही भाजपाच्या आमदारांचा प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेईल, अशी चर्चा आहे.

दरम्यान, भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असतील तर आम्ही त्यांची नावे जाहीर करणार नाही. आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन यावे लागेल, ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment