Home Breaking News 🛑 **पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनो, सतर्क राहा! डॉक्टराच्या आईंसोबत घडला भयंकर प्रकार** 🛑

🛑 **पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनो, सतर्क राहा! डॉक्टराच्या आईंसोबत घडला भयंकर प्रकार** 🛑

121
0

🛑 **पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनो, सतर्क राहा! डॉक्टराच्या आईंसोबत घडला भयंकर प्रकार** 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी चिंचवड :⭕ 73 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला जबर मारहाण करत, चोरट्यांनी  सुमारे 4 लाखांचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार  पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरणमधील अत्यंत उच्चभ्रू परिसरात असलेल्या गायत्री हेरिटेज सोसायटीमध्ये सोमवारी रात्री 10 30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 73 वर्षीय हेमलता पाटील जखमी झाल्या आहे.

त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.हेमलता यांची कन्या डॉ. कविता वर्मा यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांची आई म्हणजे हेमलता या घरी एकट्याच होत्या. त्याचाच फायदा घेऊन दोन तरुण घराच्या मागच्या दारातून घुसले आणि एकाने तोंड दाबून मारहाण करायला सुरुवात केली तर दुसऱ्याने हेमलता यांच्या अंगावरील दागिने काढू लागला. काही वेळाने चोरांनी कपाटाची चावी घेऊन त्यात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कमही घेतली आणि पुन्हा मारहाण करून पळून गेले.साधारण 11 वाजेच्या सुमारास हेमलता यांनी आपल्या मुलीला फोन करून ही घटना कळवली. कविता या स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांच्या आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान, निगडी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहिणी केली.

घराच्या मागच्या दरवाजातून आत शिरण्यापासून कपाटाची चाबी मिळविण्यापर्यंत सर्व माहित असल्याने दरोडेखोरांनी पाळत ठेऊन हा प्रकार केल्याच संशय व्यक्त केला.ज्येष्ठ नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथकं नेमली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास निगडी पोलिसांनी व्यक्त केला आहे….⭕

Previous article🛑 **सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी……! अजित पवारांवर**🛑
Next article🛑 *श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेचा…..! ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव** 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here