• Home
  • 🛑 *श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेचा…..! ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव** 🛑

🛑 *श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेचा…..! ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव** 🛑

🛑 *श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेचा…..! ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव** 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करत असताना उत्सवावर काही मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांसाठी पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पुनीत बालन यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, लीड मीडियाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुनीत बालन म्हणाले, पुण्याने जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, महापालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टच्या वतीने विधायकतेला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे च्या www.shrimantbhausahebrangariganpati.com या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे.

श्रींची प्राणप्रतिष्ठा सभामंडपातच… दर्शन ऑनलाईन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सालाबादप्रमाणे मंदिरा मध्ये होणार आहे. उत्सव मोठा नसला तरी सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहेत.

‘बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही, भाविकांना सांस्कृतिक महोत्सवासह गणरायांच्या दर्शनाचा आणि आरतीचा लाभ फक्त ऑनलाईन घेता येणार आहे…⭕

anews Banner

Leave A Comment