Home Breaking News रत्नागिरी जिल्हा लाँकडाऊन”..! ‘आॅपरेशन ब्रेक द चेन’ 🛑 ✍️:रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र...

रत्नागिरी जिल्हा लाँकडाऊन”..! ‘आॅपरेशन ब्रेक द चेन’ 🛑 ✍️:रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

90
0

🛑 रत्नागिरी जिल्हा लाँकडाऊन”..! ‘आॅपरेशन ब्रेक द चेन’ 🛑
✍️:रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. 1 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 8 जुलैच्या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले असले तरी अशा सेवांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी सायंकाळी आदेश जारी केले आहेत.

लॉकडाऊनची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडण्यात बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद असून, कोणालाही जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. अगदी पास असलेल्यांनाही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना बंदी आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयात 10 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती राहील. खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. पाणी आणि सांडपाणी व्यवस्था, फळे, भाजीपाला, दूध, ब्रेड, किराणा, बँका आणि दूरध्वनी सुविधा सुरू राहणार आहे. मासे व मांसविक्री केवळ बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच सुरू राहील. या कालावधीत सर्व रुग्णालये, नर्सिंग, लॅबोरेटरी, मेडिकल, वैद्यकीय उपकरणांची दुकाने, चष्मा दुकाने सुरू राहणार आहेत. पेट्रोल व ऑईल सुरू राहील. जे प्रक्रिया उद्योग बंद ठेवणे शक्य होणार नाही ते सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू राहील. शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्रीला ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे.

अंत्यविधीसाठी पूर्वीप्रमाणेच केवळ 20 जणांनाच परवानगी राहणार आहे. शेतीशी निगडित यंत्रणा, शीतगृहे सुरू राहणार आहेत. सकाळी 9 ते 5 या कालावधितच आस्थापना सुरू राहणार असून, नाईट कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे….⭕

Previous articleमराठा आरक्षणाच्या बाजुने! “पांडुरंग” सोबत आहेच! पण आरक्षणाचे बरं-वाईट झालं..त्याला राज्य सरकार जबाबदार राहील.✍️मुंबई :( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleटपाल विभागाची रेल्वे पार्सल सेवा..! आता नाशिक,कोल्हापूर,सोलापूर आणि अकोल्यातही.. 🛑 ✍️नाशिक :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here