Home नांदेड सादर केलेला अन्यायकारक अहवाल रद्द करा… अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर

सादर केलेला अन्यायकारक अहवाल रद्द करा… अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर

113

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0072.jpg

सादर केलेला अन्यायकारक अहवाल रद्द करा…
अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर

मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

प्रतिनिधी-पेरणी झाल्यापासून सारखा पाऊस आहे.राज्यात सर्वाधिक पासून नांदेड जिल्ह्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुखेड तालुक्यात झाला आहे.दीड महिन्यापासून पावसात खंड नाही.यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे.मुखेड तालुक्याची अशी परिस्थिती असतांना मुखेडच्या महसूल कार्यालयाने तालुक्यात केवळ 645 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला आहे.हे अत्यंत अन्यायकारक आणि संतापजनक आहे.हा अन्यायकारक अहवाल तात्काळ रद्द करून,शेतकऱ्यांना न्याय देणारा अहवाल नव्याने सादर करा.अन्यथा तहसील कार्यालयात तालुक्यातील शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करणार असा इशारा तहसीलदार काशिनाथ पाटील यांना स्वा.शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी 10 ऑगस्ट रोजी निवेदनातून दिला आहे.
शेतकरी पेरणीत दुबार-तीबार पेरणीच्या संकटाशी झगडत होता.खताची कृत्रिम टंचाई,भाववाढ यांचा सामना करावा लागत होता.त्यात पेरणीपासून लागलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले.आता शेतकरी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून होता.अशात मुखेड महसूल कार्यालयाने तालुक्यातून केवळ 645 हेक्टर क्षेत्र महापुराने बाधित झाल्याची माहिती पुढे पाठवल्याची बाब समजली.हे अत्यंत अन्यायकारक आणि संतापजनक आहे.याबद्दल संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजीची चीड आहे.हा पाठवलेला अन्यायकारक अहवाल कोणत्या निकषांच्या आधारावर पाठवला गेला?तात्काळ महसूल प्रशासनाने यात दुरुस्ती करून नव्याने अहवाल सादर करावा असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Previous articleअखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चाचे आयोजन
Next articleआजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सेलू शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.