• Home
  • कामजळगा येथील उपकेंदात कोरोना लसिकरणाचा शुभारंभ . पहिल्याच दिवशी ६० जणांना लसिकरण.

कामजळगा येथील उपकेंदात कोरोना लसिकरणाचा शुभारंभ . पहिल्याच दिवशी ६० जणांना लसिकरण.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210401-WA0001.jpg

कामजळगा येथील उपकेंदात कोरोना लसिकरणाचा शुभारंभ .
पहिल्याच दिवशी ६० जणांना लसिकरण.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सरकारने पहिले कोरोना लसीकरण मोहीम ही जलद गतीने व्हावे म्हणून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिली आता एक पाऊल पुढे टाकत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले यांच्या नेतृत्वाखाली आता तेच लसीकरण मोहीम तालुक्यातील ग्रामीण भागातील 13 उपकेंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे आणि पहिल्याच दिवशी जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच सावरगाव केंद्रांतर्गत कामजळगा येथील उपकेंदात कोरोना-१९ या लसिकरणाचा शुभारंभ सरपंच प्रतिनिधी रामराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.पहिल्याच दिवशी ६० जणांना लसिकरण करण्यात आले.
शहरी भागा सह ग्रामीण भागातही कोरोना चा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने २७ मार्च पासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या उपकेंदात ही लसिकरणास सुरूवात झाली आहे .कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपकेंद्रा अंतर्गतचा गावातील जनतेला लसिकरणाचा लाभ गावातच मिळावा म्हणून प्रशासनाने सुरूवात केली आहे .सदरील कोविड लस ही अत्यंत सुरक्षित आहे . ही लस कामजळगा येथील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ ज्योती रामराव पाटील यानी केले आहे .यावेळी वैधकीय अधिकार डॉ मेकेवाड हणुमंत,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ शुभांगी सौराते, आरोग्य सेविका गायत्री जाधव (पवार), पेटकर एस.पी.,सावंत मनोहर ,खलसे पी.आर.,शेख फरजाना, मारोती चिटमुंगरे,राजकुमार कवठेकर,प्रा.गजानन कवठेकर,बाबुराव टिपराळे.सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थाची उपस्थिती होती..

anews Banner

Leave A Comment