• Home
  • क्रुष्णुर येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने कच्या हळदीला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान राजेश एन भांगे

क्रुष्णुर येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने कच्या हळदीला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान राजेश एन भांगे

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210331-WA0055.jpg

क्रुष्णुर येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने कच्या हळदीला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

राजेश एन भांगे/युवा मराठा न्युज नेटवर्क

 

नायगाव तालुक्यातील कृष्णुर अद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनीत मोठया प्रमाणात कच्या हळदीची कंपनीने खरीदी चालू केली असुन. शेतकऱ्यानी थेट कंपनीला या पूर्वीही सोयाबीन, हरबरा, ज्वारी, गहू विक्री केली आहे.
तर आजघडीला कची व पक्की हळद कंपनीला विक्री करत असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केल्यामुळे शेतकरी मोठया अडचणीत सापडला असून सदरची अडचन दूर करण्यासाठी कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे शेतकऱ्याची आर्थिक अडचण दूर करुन कच्या हळदीची कंपनीने खरीदी चालू केल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन मुळे सर्व मार्केट अडत दुकाने बंद असल्याने शेतकऱ्याचा मोठे नुकसान होत आहे.

तालुक्यातील इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनी एम.आय.डी.सी. कृष्णुर ही लॉकडाऊनच्या काळात होत असलेली शेतकऱ्याची हेळसांड लक्षात घेऊन कंपनीने शेतकऱ्याला चांगलाच आधार दिला असल्याचे जिल्ह्यतुन जनतेसह शेतकरी वर्गातून बोलल्या जात असून कची हळद शेतकरी कंपनीला देत असल्यामुळे मोठा फायदा होत आहे.

शेतकरी राजा आपल्या शेतात सोने पिकावित असतो कंपनीने हळदीची कॉलेटी पाहून १६०० ते २००० रुपये प्रती क्विंटल दरा प्रमाणे कची हळद खरीदी करत असल्याने हळदीला सोन्याचा भाव दिला असल्याचे मोठ्या समाधानाने बोलले जात आहे.
व कंपनीत कच्या हळदीची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे
कची हळद कंपनीला शेतकऱ्यानी विक्री केल्याने शेतकऱ्याला चांगलाच फायदा होत आहे.

शेतकऱ्यानी शेतातील हळद काढल्या नंतर त्या हळदीला शिजविने, कडक उन्हात वाळू घालणे, ढोल करणे, मार्केट मध्ये घेवून जाणे असी एका महिन्याची अतोनात शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते आणि मजुरा अभावी शेतकऱ्यांना उत्पन्न होऊन ही घट होते आणि तोटा सहन करावा लागत होता परंतु कंपनीने कची हळद खरीदी करत असल्याने शेतकऱ्यांचे जिवनमान प्रफुलीत झाल्याचे दिसून येत आहे

दिनांक १६ मार्च २०२१ रोजी इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनीत कची हळद खरीदी करण्यास सुरुवात या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आल्यामुळे सदरच्या कंपनीला महाराष्ट्रासह मराठवाड्यातुन व खेड्या पाड्यातुन हळदीची आवक मोठया प्रमाणात येत असुन शेतकऱ्यानी कंपनीशी संपर्क साधावा.

982375808, 9322434715
9960884175, 7821867531, 9921070710

anews Banner

Leave A Comment