Home अमरावती अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताच्या पाईपलाईन वर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न,४० जन स्थानबध्द.

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताच्या पाईपलाईन वर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न,४० जन स्थानबध्द.

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0026.jpg

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताच्या पाईपलाईन वर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न,४० जन स्थानबध्द.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी.एन..देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे अप्परवर्धा प्रकल्पग्रस्ताच्या प्रलंबित मागणीसाठी २७ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाने शुक्रवारी हिसकळून घेतले. शुक्रवारी अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन होण्यासाठी हल्लाबोल करीत आंदोलक हाती दगड घेऊन गेट तोडण्यासाठी सरसावले. या झटपटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला, तर सुमारे ४० जणांना स्थान बध्दकरण्यात आले. मोर्शी तहसील कार्यालयापासून शेकडो महिला पुरुष आंदोलन करते अप्पर
वर्धा धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ जाऊन त्या ठिकाणी ठीया मांडून बसले. त्यापूर्वीच आंदोलनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलीस ताफा तैन्यात करण्यात आला होता. शासन प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी नारेबाजी सुरू केली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे, तहसीलदार सागर ढवळे, ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी आंदोलन कर्त्यांच्या मागण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठविण्यात आले, असे सांगून तहसीलदार सागर ढवळे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना दूरध्वनीवरून कळविले. तथापि यांनी प्रथम सचिवांशी बोलण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा हकीगत कळविण्यात आली, परंतु ही बाब जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील नव्हे, शासन स्तरावरील असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. दरम्यान काही आंदोलकांनी हातात दगड घेऊन आपण वर्गाचे भेट सोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविले व ३०ते४० आंदोलन करताना व्हॅन मध्ये टाकून पोलीस ठाण्यात आणले. आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक व झटापटीत एक पोलीस कर्मचाऱ्याला डोळ्याला मार लागला. दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाका बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. यावेळी मोर्शी, वरुड, शिरखेड पोलीस तसेच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका सुद्धा केली आंदोलनात मोर्शी, वरुड तालुक्यातील शकलो धरणग्रस्त महिला पुरुष उपस्थित होते. मोशी पोलिसांनी कलम ६८,६९ अंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेऊन सुटका करण्यात आली. असेच आंदोलन यापूर्वी सुद्धा माय वाडी येथे करण्यात आले होते. प्रकल्प ग्रस्तांनी काही दिवसापूर्वी माय वाडी येथून नांदगाव पेठ एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोर्शी पोलिसांनी तो आणून पडला होता. त्यानंतर मोर्शी अमरावती मार्गातील पंचायत समिती समोर रास्ता रोको आंदोलन केले होते.

Previous articleखेडले झुंगे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा-
Next articleयेणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : शेतकरी कामगार पक्ष
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here