Home गडचिरोली येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : शेतकरी कामगार पक्ष

येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : शेतकरी कामगार पक्ष

159
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0030.jpg

 

येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : शेतकरी कामगार पक्ष

जिल्हास्तरीय सभेत झाला निर्णय

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- : शेतकरी कामगार पक्ष राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतांनाही विधानसभा निवडणुकीत दगाबाजी करुन उमेदवार पराभूत केले. जिल्ह्यातही शेकापला गृहित धरले जाते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपासह महाविकास आघाडीच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने प्रागतिक पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करत येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय सभेत एकमताने घेतला.

स्थानिक प्रेसक्लब भवनात शेतकरी कामगार पक्षाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, तुकाराम गेडाम, सरपंच दर्शना भोपये, सरपंच सावित्री गेडाम, डॉ.गुरुदास सेमस्कर,माजी सरपंच निशाताई आयतुलवार, ग्रा.प.सदस्य चंद्रकांत भोयर, ग्रा.प.सदस्य कविता ठाकरे, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली विधानसभेसह जिल्हा परिषदेच्या ३० जागांवर पक्षाच्या खटारा या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा आणि उर्वरित जागा प्रागतिक पक्षांच्यासह मिळून लढण्याचा ठरावही सभेत करण्यात आला. जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीकरीता इच्छुकांच्या नावावर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकांपूर्वी पक्षाची संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी गावा गावात शाखा स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

यासभेला ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोयर, ग्रामपंचायत सदस्य विलास अडेंगवार, प्रभाकर डोईजड, दामोदर रोहनकर, देवराव शेंडे, क्रीष्णा नैताम, मारोती आगरे, रेवनाथ मेश्राम, डंबाजी भोयर, तुळशीदास भैसारे, नितीन मेश्राम, पवित्र दास, अनिमेश बिश्वास, विश्वनाथ म्हशाखेत्री, भैय्याजी कुनघाडकर, सुरेश चौधरी, देविदास मडावी, रामदास आलाम, रमेश ठाकरे,रोशन मेश्राम, राजकुमार प्रधान, तितिक्षा डोईजड, छाया भोयर, काजल पिपरे, रजनी खैरे, शुल्का बोबाटे, निर्मला सुरपाम, प्रतिमा मोहुर्ले, विजया मेश्राम,पुष्पा कोतवालीवाले यांचे सह पक्षाचे गाव शाखेचे चिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताच्या पाईपलाईन वर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न,४० जन स्थानबध्द.
Next articleचाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त : तरुणा विरोधात गुन्हा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here