• Home
  • 🛑 सासवड पोलिसांकडून दोन दिवसांत….! 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल 🛑

🛑 सासवड पोलिसांकडून दोन दिवसांत….! 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल 🛑

🛑 सासवड पोलिसांकडून दोन दिवसांत….! 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

सासवड/पुणे ⭕- शहरातील नागरिक करोनाच्या नियमांची सर्रासपणे नियमांची पायामल्ली करीत असल्याने काही केल्या करोनाचा कहर कमी होत नाही.

म्हणून अखेर पोलिसांनी दंडात्कम कारवाईचा बडगा उचला आहे. यात शनिवारी (दि. 29) 52 हजार तर रविवारी (दि. 30) सासवड बंद असूनही 57 हजार 900 असा दोन दिवसांत एकूण 1 लाख 9 हजार 900 दंड वसूल करण्यात आला आहे.

सध्या पुरंदर तालुक्‍यात ग्रामीण भागात व सासवडमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून विना मास्क फिरणे तसेच रस्त्यावर फिरणे, रस्त्यावर थुंकणे या गोष्टी कटाक्षाने टाळावयाच्या आहेत.

प्रशासनाला दंडात्मक कारवाईची गरज भासली नाही पाहिजे. नागरिकांनी प्रशासनाचे आदेश न पाळल्यास अधिक कठोरपणे कारवाई केली जाईल आणि ती गरजेची आहे. त्यानुसार शनिवारी विना मस्क फिरणाऱ्या व मोटरवाहन काद्यानुसार 279 जणांकडून 52 हजार तर रविवारी 490 जाणांकडून 57 हजार 900 रुपये दंड वसूल करून त्यांना गुलापुष्प देवून गांधीगिरी करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे, अशी माहिती सासवड ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली….⭕

anews Banner

Leave A Comment