Home Breaking News 🛑 मागील १२ वर्षापासून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा….! बुधवारी होणारा लिलाव 🛑

🛑 मागील १२ वर्षापासून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा….! बुधवारी होणारा लिलाव 🛑

108
0

🛑 मागील १२ वर्षापासून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा….! बुधवारी होणारा लिलाव 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕येरवडा पोलिसांनी सन 2008 पासून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अनेक वाहने जप्त केली आहेत.

त्यातील काही वाहन मालकांचा शोध लागला, तर काही वाहन मालकांनी वाहनांवर आपला मालकी हक्क दाखवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहने सोडवून नेली आहेत.

मात्र जप्त केलेल्या 9 वाहनांवर कोणीही मालकी हक्क सांगितलेला नाही. तसेच पोलिसांना देखील वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लागलेला नाही.

या वाहनांची यादी येरवडा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. आजपर्यंत या वाहनांवर कोणीही हक्क सांगण्यासाठी समोर आलेले नाही.

ही वाहने खूप दिवसांपासून पडून असल्याने गंजलेली व खराब झालेली आहेत. या 9 दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लिलावासाठी कायदेशीर परवानगी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात आणखी वाहनांच्या लिलावाची परवानगी मिळाल्यास त्यांचा देखील लिलाव बुधवारी (दि. 2) करण्यात येणार आहे.

ही लिलाव प्रक्रिया वाहतूक शाखा कार्यालय, बंगला नंबर 5, एअरपोर्ट रोड, येरवडा पुणे येथील आवारात सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.⭕

Previous article🛑 सासवड पोलिसांकडून दोन दिवसांत….! 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल 🛑
Next article🛑 पदवीधर ,अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर….! रेल्वेत नोकरीची “सुवर्ण संधी “…! ३५ हजार जगासाठी मेगाभरती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here