Home जळगाव चोपडा शहरात बनावट बियाण्यांचा एक लाखांचा साठा जप्त, शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांकडून...

चोपडा शहरात बनावट बियाण्यांचा एक लाखांचा साठा जप्त, शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांकडून बेड्या

155

आशाताई बच्छाव

Screenshot_20230526-065040_Google.jpg

चोपडा शहरात बनावट बियाण्यांचा एक लाखांचा साठा जप्त, शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांकडून बेड्या
जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.
चोपडा : रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (35, रा.वर्डी, ता.चोपडा) यांनी बोगस बियाण्यांचा साठा विक्रीला आणल्याचे गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत सुमारे एक लाखांचे बियाणे जप्त केली. बुधवार, 24 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. स्वदेशी-5 कापूस बनावट बियाणांची 95 पाकिटे जप्त करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा-धरणगाव रस्त्यावरील हॉटेल न्यू सुनीता मध्ये बनावट बियाणे असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये तपासणी केली असता संदीप पाटील हा त्याचे वाहन नादुरुस्त झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेवून गेल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर अमोल राजपूत यांनी दिली. त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी-5 संकर देशी कापूस बियाणे असलेली 99 हजार 750 रु. किमतीची 95 सीलबंद पाकिटे आढळल्याने ती जप्त करण्यात आली. अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात शासन व शेतकऱ्यांची
फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वर्डी येथून त्यास अटक करण्यात आली. बोगस बियाणांच्या रॅकेटचा लवकरच पर्दाफाश होईल, असा विश्वास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांनी व्यक्त केला.केला.

Previous articleकाटेल धाम येथे शासन आपल्या दारीं… योजना
Next articleसटाणा व्ही.पी.एन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ७९.४८ % ; हर्षाली संजय दळवी विद्यालयात प्रथम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.