Home बुलढाणा काटेल धाम येथे शासन आपल्या दारीं… योजना

काटेल धाम येथे शासन आपल्या दारीं… योजना

139

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0029.jpg

काटेल धाम येथे शासन आपल्या दारीं… योजना

सर्व शेतकरी,सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा उपविभागीय अधिकारी काळे यांचे आव्हाहन

संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे शासन आपल्या दारीं महाराष्ट्र शासनाचे हे अभियान दि.29 मे रोजी वर्णी लागणार आहे. या योजनेचे निवेदन संग्रामपूर तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने दि.9 मे रोजी तहसीलदार संग्रामपूर यांना देण्यात आले होते. निवेदनाचा पाठपुरावा करत तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ मिळावा करिता उपविभागीय अधिकारी काळे जळगाव जा यांच्या सह .,तहसीलदार संग्रामपूर, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच पत्रकार मंडळी यांनी एकत्र येऊन ही योजना राबवीन्या करिता काटेल येथे कार्यक्रम स्थळी दि.25 मे ला भेट देऊन योजनेचेपुर्व नियोजन केले आहे
या योजनेमध्ये आधार कार्ड, शिधा पत्रिका, श्रावण बाळ, वृद्धापकाळ,विधवा, दिव्यांग-योजना तसेच संजय गांधी निराधार योजना,वीज कनेक्शन,जन्म मृत्यूच्या नोंदी राज्य निवृत्ती योजना तसेच इतर अनेक शासनच्या वेगवेगळ्या योजनाचा लाभ नागरिकांना थेट एकाच ठिकाणी, एकाच वेळी घेता येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ 13 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका शताखाली लाभ देण्यात मिळणार असून निर्धारित शुल्क, 200 हून अधिक योजना, कमीत कमी कागदपत्रे, तर जलद मंजुरी करिता शासन आपल्या दारीं ही योजना अमलात आली आहे हे विशेष..
संग्रामपूर तालुक्यात काटेल येथे दि 29 मे ला होणाऱ्या शासन आपल्या दारीं योजनेच्या कार्यक्रमासाठी पाहणी करण्यात आली

Previous articleदहिवड येथील वादग्रस्त खडी क्रेशर बंद करण्याचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर 
Next articleचोपडा शहरात बनावट बियाण्यांचा एक लाखांचा साठा जप्त, शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांकडून बेड्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.