Home नाशिक खेडले झुंगे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा-

खेडले झुंगे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा-

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0032.jpg

खेडले झुंगे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा-

विठ्ठलाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण —

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

खेडले झुंगे तालुका निफाड येथील परमपूज्य तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१०वी आणि १२वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास म.वी. प्र.समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.श्रीकांत आवारे आणि छबुराव जाधव हे होते,अध्यक्षस्थानी निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख होते.विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत संबळ वादन करत सर्व मान्यवरांचे स्वागत केले.योगीराज तुकाराम बाबा यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी कोटकर यांनी केले. इ.१० वी आणि १२वी बोर्ड परीक्षा,विविध शिष्यवृत्ती परीक्षा,संस्था अंतर्गत राबविलेल्या स्पर्धा परीक्षा यासारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.श्रीकांत आवारे यांनी विद्यालयाचे मार्गदर्शक शिक्षक आणि गुंणवत विद्यार्थी यांना शुभेच्छा देत गुणगौरव सोहळ्यासारखे प्रेरणादायी उपक्रम राबविले पाहिजेत असे सांगितले.ग्रामीण,शहरी हा शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता भेद संपुष्टात येऊन ग्रामीण विद्यार्थी हे शहरी विद्यार्थ्यांपेक्षा सरस ठरत आहेत ही गोष्ट शिवाजी गडाख यांनी मनोगतातून निदर्शनात आणून दिली.उपस्थित विद्यार्थी,पालक,शिक्षक,ग्रामस्थ यांना उद्देशून बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रतिपादन केले की मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही खेडले विद्यालयाच्या सर्वच प्रश्नांना न्याय मिळवून देण्यास कटिबध्द आहे.शिक्षकांनी विद्यार्थ्याना बालवयातच त्यांच्यातील कलागुणांची ओळख करून देऊन शिक्षणासोबतच त्यांची अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडण करावी.नोकरी करणे हे ध्येय न ठेवता व्यावसायिक,तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतः नोकरी देणारे व्हा.. हे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास भारती यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र गीते यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक सुभाष शिंदे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दिलीप, राजेंद्र गोरडे, घोटेकर,.कैलास साबळे,शिवनाथ सदाफळ, राधाकिसन घोटेकर,दत्तात्रय घोटेकर,शिवाजी हागोटे,नवनाथ घोटेकर,निलेश घोटेकर,नवनाथ घोटेकर,मोहन घोटेकर,केदार नांगरे, लक्ष्मण सदाफळ, ज्ञानेश्वर गीते,रामदास घोटेकर,संदीप घोटेकर,नंदकिशोर गिते,धर्मराज घोटेकर विलास वाघ,हमीद शेख,दशरथ घोटेकर, सोपान घोटेकर यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी,पालक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

Previous articleसीता आदर्श माता-भाग ३
Next articleअप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताच्या पाईपलाईन वर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न,४० जन स्थानबध्द.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here