Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान.

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0033.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट- माहुर रस्त्यावर अय्यपा स्वामी मंदीराजवळ अज्ञात इसमाचा अपघात झाला ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील यांना कळताच तात्काळ घटनास्थळी पोहचले व रुग्णवाहिका गाडीला फोन करून बोलावून घेतले व घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकामध्ये बसवून अपघात झालेल्या रुग्णास गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचला असून ते सुखरूप आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी रिस्क घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीला जीवदान दिल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, सर्व राज्य व विभागीय पदाधिकारी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleकृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ
Next articleपिंपळगावी ऐतिहासिक स्थळी छत्रपती संभाजी राजेंची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here