Home नाशिक पिंपळगावी ऐतिहासिक स्थळी छत्रपती संभाजी राजेंची भेट

पिंपळगावी ऐतिहासिक स्थळी छत्रपती संभाजी राजेंची भेट

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0017.jpg

पिंपळगावी ऐतिहासिक स्थळी छत्रपती संभाजी राजेंची भेट
पिंपळगाव बसवंत :सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी
सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून बहुजनांच्या न्याय हक्कासाठी कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी आयुष्य वेचले. गणपतदादांच्या कार्याची दखल घेऊन त्या काळी खुद राजर्षी शाहू महाराजांनी गणपतदादांना राजवस्त्र प्रदान करत प्रोत्साहन दिले होते. समाजात पुरोगामी विचार शाहू महारांजासह कर्मबीर गणपत दादांच्या माध्यमातून पेरला गेला. शाहू महाराज व गणपत दादांच्या या ऐतिहासिक आठवणींसह विचारांचा उजाळा निर्माण व्हावा, यासाठी भोसले- मोरे या दोन्ही घराण्यांचे ऋणानुबंध कायम ठेवणार असल्याचा विश्वास छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त माजी खा. छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी गणपत दादा मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन दहा वर्षांपूर्वी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव शहरात भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा ही दुसरी भेट शाहू महाराज व गणपत दादा मोरे याच्या या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारी ठरली.पिंपळगाव शहरातील रानमळास्थित निवासस्थानी मोरे कुटुंबाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदी उपस्थित होते. व्यासपीठावर मविप्र समाजाचे माजी सभापती नितीन ठाकरे, मविप्रचे संचालक प्रल्हाद गडाख, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे, छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, राजेंद्र डोखळे, साहेबराव मोरे, बाळासाहेब बनकर, रवींद्र मोरे, बाळासाहेब पिंगळे, विजय गडाख, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील,
गणेश बनकर, संजय मोरे, सुहास मोरे, प्रा. अशोक सोनवणे, प्रदीप गायकवाड, माधव गिते, पंढरीनाथ देशमाने
पुढे ते म्हणाले, आजची युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांनी घडत आहे. शाहू महाराजांचे बंदा स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचे पाय ज्या पुण्यभूमीला लागले त्या ठिकाणी भेटी देत ऐतिहासिक आठवणी व विचारांना उजाळा देत असल्याची माहिती संभाजीराजे महाराज यांनी यावेळी दिली.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान.
Next articleराहुड परिसरात वन विभागांतर्गत वृक्षारोपणास कालपासून प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here