Home Breaking News 🛑 **लांबून बोला, आमचे चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह…..! अजित पवार मनसे नगरसेवकावर...

🛑 **लांबून बोला, आमचे चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह…..! अजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले** 🛑

142
0

🛑 **लांबून बोला, आमचे चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह…..! अजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले** 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाने विळखा घातला असून आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार मनसे नगरसेवकावर चांगलेच भडकलेले दिसले. आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोला….

फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांना पवारांनी खडेबोल सुनावले. मात्र, एवढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला? ऐकूनच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलंच कशाला? असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे..

एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते . त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो covid सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते.

मात्र अजित पवारांनी ऐकून घेणं तर दूरच, उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवारांच्या नकळत हा प्रकार घडला.

मास्क लावलेला असल्यानं नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. सोशल डिस्टंसिंगबाबत त्यांनी दिलेल्या सूचना योग्य आहेत. मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती संबंधित सन्मानीय नगरसेवकास केली आहे.

त्याचबरोबर त्यांच्या मागण्या अजित पवारांशी प्रत्यक्ष भेटून ठेवणार आहोत, असेही वाघेरे म्हणाले….⭕

Previous article🛑 मुंबईत येणार्‍यांसाठी…..! महापालिकेनं घेतला ” हा ” मोठा निर्णय…..! 🛑
Next article🛑 पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर, संयुक्त विद्यमाने “….. मिशन झिरो “….! उपक्रम राबविणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here