• Home
  • 🛑 मुंबईत येणार्‍यांसाठी…..! महापालिकेनं घेतला ” हा ” मोठा निर्णय…..! 🛑

🛑 मुंबईत येणार्‍यांसाठी…..! महापालिकेनं घेतला ” हा ” मोठा निर्णय…..! 🛑

🛑 मुंबईत येणार्‍यांसाठी…..! महापालिकेनं घेतला ” हा ” मोठा निर्णय…..! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यावरून बिहार पोलिसांनी महापालिकेवर आरोप केले होते. या प्रकरणानंतर महापालिकेनं कडक भूमिका घेतली आहे.

महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम सक्तीचा केला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेनं आदेश काढले आहेत.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना महापालिका प्रशासनानं क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितलं होतं. त्यावरून बृह्नमुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली होती. या प्रकरणानंतर महापालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे.

महापालिकेनं क्वारंटाइनच्या नियमासंदर्भात नवीन आदेश काढले आहेत.

राज्य सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आदेशातील क्वारंटाइनच्या नियमाचा हवाला देत महापालिकेनं मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनं 14 दिवस होम क्वारंटाइन राहणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे….⭕

anews Banner

Leave A Comment