• Home
  • पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार… ! 🛑

पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार… ! 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0091.jpg

🛑 पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार… ! 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर⭕:-एकनाथ रामकृष्ण बर्वे ( ४८ वर्ष ) असे त्यांचे नाव आहे. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शनिवारी ( दि. २० ) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.हेड कॉन्स्टेबल एकनाथ रामकृष्ण बर्वे हे लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून ( एमएच १७, सीबी ८६९७ ) प्रवास करीत असताना तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीकच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने ( केए ३२, सी ५१६६ ) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातात एकनाथ बर्वे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवत असताना बर्वे यांनी हेल्मेट घातलेले होते, मात्र अपघातात हेल्मेट दूर जावून पडले.कनाथ बर्वे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

अपघातास कारणीभूत चालक मालवाहू ट्रक नजीकच रस्त्याच्याकडेला लावून पसार झाला. ⭕

anews Banner

Leave A Comment