• Home
  • शरद पवारांच्या पुराव्याविरोधात फडणवीस नडले,देशमुखांच्या स्पष्टीकरणाने तोंडावर पडले..

शरद पवारांच्या पुराव्याविरोधात फडणवीस नडले,देशमुखांच्या स्पष्टीकरणाने तोंडावर पडले..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0087.jpg

🛑 शरद पवारांच्या पुराव्याविरोधात फडणवीस नडले,देशमुखांच्या स्पष्टीकरणाने तोंडावर पडले….? 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूल केल्याचा अतिशय गंभीर आरोप केला. त्यांनी एक पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यात सगळ्या बाबी सांगितल्या.

त्यामुळे राज्यसरकार आणि राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या सगळ्या गोष्टी सुरु असताना भाजपकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, आज (२२ मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांनी पत्रातून अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याने त्यांचा राजीनामा होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

पवारांनी अनिल देशमुख यांची बाजू घेत परमवीर सिंग यांनी पत्रात यांनी ज्या तारखेला अनिल देशमुख आणि सचिन वाझे भेटले होते असा उल्लेख केला आहे त्या दिवशी अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये एडमिट असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत.

त्यावरून ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातून ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वॉरंटाईनचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीसांचे ट्विट?

दरम्यान, यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतल्याचं दिसत आहे.देवेंद्र फडणीस यांनी थेट १५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला आहे.

“देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. १५ ते २७ फेब्रुवारीला कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे.

अनिल देशमुखांनी काय स्पष्टीकरण दिलं….?

अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की “मला कोविड झाल्यामुळे ५ ते १५ फेब्रुवारीला नागपूरच्या एलॅक्सी रुग्णालयात ॲडमिट होतो.

१५ फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी हॉस्पिटलच्या बाहेर पडत असताना अनेक पत्रकार गेटवर उभे होते. त्यांना मला काही प्रश्न विचारायचे होते. पण कोविडमधून नुकतंच बाहेर आल्यामुळे माझ्या अंगात त्राण नव्हतं, खुप विकनेस होता. त्यामुळे मी हॉस्पिटलच्या गेटवर खुर्चीवर बसलो.

आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन गाडीत बसलो. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी मी होम क्वॉरंटाईन होतो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडल्यानंतर सयानी हेस्ट हाऊस येथे मीटींगला गेलो”.

दरम्यान, एकीकडे परमबीर सिंग यांनी ज्या तारखेला सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. त्या दाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोडून काढले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत १५ तारखेला अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत्याचं सांगितलं त्यावर स्वत: अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडताना पत्रकारांनी घेरले आणि त्याची उत्तर रुग्णालयाच्या गेटवरच दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सध्या तरी पवार आणि अनिल देशमुख यांचे दावे खरे असल्याच बोललं जात आहे.⭕

anews Banner

Leave A Comment