Home परभणी पत्रकार हल्लाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

पत्रकार हल्लाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

169

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0074.jpg

पत्रकार हल्लाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)पूर्णा :-तालुक्यातील माखणी येथील पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यावर गावातील सरपंच गोविंद हरीभाऊ आवरगंड व इतर यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी पूर्ण तालुका मराठी पत्रकार संघाकडून तहसीलदार पूर्णा यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला ग्रामीण भागातील पत्रकारावर हल्ला करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. तरी पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यावर हल्ला करणाऱ्या हलेखोरांवर कडक शासन करण्यात यावे अन्यथा तालूका पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र अंदोलन घेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर दौलत भोसले, सुशिलकुमार दळवी, अच्युत जोगदंड, मुजीब कुरेशी, गजानन हिवरे, माधवराव मोहिते, केदार पाथरकर, संपत तेली, मोहन लोखंडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleमाजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन
Next articleठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.