Home बुलढाणा ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….

ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….

134
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0058.jpg

ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….

जळगाव जा,(सतिश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क).:- मौजे वडशिंगी येथील गोपाल वानखडे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतःचे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ आत्महत्या केली होती.

या आत्महत्येला ९ महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा या कुटुंबाला तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक वेळेस उडवाउठवचे उत्तरे देवून वेळकाढू धोरण मारून देण्यात आले होते. त्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींनी किती दिवस शासकीय मदतीपासून वंचित रहावे हा सुद्धा प्रश्न असल्यामुळे आज दिनांक २४ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भुमीत्रांच्या वतीन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला होता.

त्यामुळे आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला २ तास उलटून सुद्धा संबंधित महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला फिरवून न पाहिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता.

त्यानंतर आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने दखल घेत नायब तहसीलदार गायकवाड यांनी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मृत गोपाल वानखडे यांच्या पत्नील व मुलगा प्रज्वल वानखडे यांना १ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात दिला.

यावेळी तुकाराम पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, अशपाक देशमुख, शुभम रोठे, सोपान पाटील, गणेशसिंग परिहार, विजय पाटील, अवी पाटील तसेच बहुसंख्य आंदोलनकर्ते तहसील परिसरामध्ये जमले होते.

Previous articleपत्रकार हल्लाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा
Next articleपर्यावरण संर्वधन व विकास समीती, महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष पदी संजय कोचे यांची नियुक्ती।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here